Home पालघर-ठाणे / नवी मुंबई / रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग *विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्येनंतर उद्धव ठाकरेंनी घेतली कुटुंबीयांची भेट; गुन्हेगारांना...

*विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्येनंतर उद्धव ठाकरेंनी घेतली कुटुंबीयांची भेट; गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणार – ठाकरे*

49
0

*विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्येनंतर उद्धव ठाकरेंनी घेतली कुटुंबीयांची भेट; गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणार – ठाकरे*

*ठाणे: निष्ठावंत शिवसैनिक प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण; उद्धव ठाकरेंनी घेतली कुटुंबीयांची भेट*

आपल्या ठाण्याचे निष्ठावंत शिवसैनिक, विभागप्रमुख स्व. प्रदीप पूर्णेकर यांच्यावर गोळीबार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी आज ठाणे येथील पूर्णेकर यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

यावेळी शिवसेना नेते व खासदार श्री. अरविंद सावंत, शिवसेना नेते-सचिव व मा. खासदार श्री. विनायक राऊत, शिवसेना नेते व आमदार ॲड. अनिल परब, शिवसेना सचिव व आमदार मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

“या कठीण काळात आम्ही पूर्णेकर कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. या भ्याड हल्ल्यातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही,” असा भक्कम विश्वास उद्धवसाहेबांनी यावेळी कुटुंबीयांना दिला.

यावेळी ठाणे जिल्हाप्रमुख श्री. केदार दिघे, बेलापूर जिल्हाप्रमुख श्री. प्रकाश पाटील, ठाणे जिल्हा संघटिका रेखाताई खोपकर यांच्यासह शिवसेनेचे इतर पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*
—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here