मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे – नाशिक महामार्गाच्या पाहणीला सुरुवात केली. यावेळी त्यांनी खारेगाव येथे खाडीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन खाडीपुलाच्या कामाची पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ठाणे- नाशिक महामार्गावर पडलेले खड्डे, होणारी वाहतूक कोंडी याबाबत बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या. यावेळी त्यांनी स्वतः पाहणी करून चाललेल्या कामाचा आढावा घेऊ असे अधिकाऱ्यांना सांगितले होते. केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.





















