Home पुणे *माळेगाव सहकारी साखर कारखान्याची ७१ वी वार्षिक सभा

*माळेगाव सहकारी साखर कारखान्याची ७१ वी वार्षिक सभा

37
0

*माळेगाव सहकारी साखर कारखान्याची ७१ वी वार्षिक सभा
– २८ सप्टेंबर*

चेअरमन आणि उपमुख्यमंत्री *सुनेत्रा पवार* यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली.

*त्यांच्या भाषणातील मुख्य मुद्दे:*

– *अजितदादांचे स्वप्न:* माळेगाव कारखाना देशात नंबर १ वर नेण्याचे अजितदादांचे स्वप्न होते. ते अपूर्ण स्वप्न आपण सर्वांनी मिळून पूर्ण करूया, असं आवाहन त्यांनी केलं.

– *जबाबदारी:* स्वर्गीय अजितदादांच्या निधनानंतर ही जबाबदारी माझ्यावर आली आहे. हा कारखाना फक्त संस्था नाही तर लोकचळवळ आहे, असं त्या म्हणाल्या.

– *सभासदांच्या सूचना:* सर्व सभासदांनी मांडलेल्या सूचना सकारात्मक घेतल्या आहेत. यावर्षी गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत उच्चांकी भाव दिला आहे, पुढच्या वर्षीही उच्चांकी भाव देण्याचा प्रयत्न करू.

– *दुष्काळ आणि काटकसर:* हे वर्ष दुष्काळाचं आहे, बारामतीत दुष्काळ जाहीर झाला आहे. त्यामुळे कारखान्यात काटकसरीला प्राधान्य देऊ, शेतकऱ्यांनी पाण्याचा जपून वापर करावा.

– *ऊस वाहतूक:* वाहतूक संघटनेच्या अडचणी लवकर सोडवू, सर्व घटकांना सोबत घेऊन पुढे जाऊ, असं आश्वासन दिलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here