मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवा! पृथ्वीराज चव्हाण यांची मोठी मागणी*
*मुंबई, दि. २७:* निवडणूक आयोगाच्या कामकाजावर ‘द इंडियन एक्सप्रेस’ने प्रसिद्ध केलेल्या धक्कादायक अहवालानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. माजी मुख्यमंत्री *पृथ्वीराज चव्हाण* यांनी मुख्य निवडणूक आयुक्त *ज्ञानेश कुमार* यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.
*पृथ्वीराज चव्हाण यांचे ४ मोठे आरोप/मागण्या:*
*१) एकहाती निर्णय?:* ‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार हे इतर दोन आयुक्तांशी चर्चा न करताच एकटेच निर्णय घेत होते. या वृत्ताचं अजूनही खंडन झालं नाही.
*२) अधिकाराचा गैरवापर?:* “ते कोणाला निवडणुका जिंकण्यास मदत करत होते?” असा थेट सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. गेल्या १२ वर्षातील मोदी सरकारवरील हा सर्वात गंभीर आरोप असल्याचं त्यांनी म्हटलंय.
*३) ‘आम्ही एकत्र निर्णय घेतले’ हे स्पष्टीकरण फोल:* आयोगाने “आम्ही एकत्रितपणे निर्णय घेतले” असे सांगितले असले तरी तपासाअंती ते टिकत नसल्याचा दावा चव्हाण यांनी केला. कायद्यानुसार निर्णय एकमताने किंवा बहुमताने सामूहिकरित्या घेणे बंधनकारक आहे – टी.एन. शेषन विरुद्ध भारत सरकार (१९९५) निकालाचा दाखला दिला.
*४) महाभियोगाची मागणी:*
– काँग्रेसने INDIA आघाडीची तातडीने बैठक बोलवावी
– राहुल गांधींच्या नेतृत्वात राष्ट्रपतींची भेट घेऊन CEC ना हटवण्याची मागणी करावी
– गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून (Suo Moto) दखल घ्यावी
– संविधानाच्या कलम ३२४ नुसार महाभियोग प्रस्ताव आणावा
> “निवडणुका मॅनेज केल्या तर लोकशाहीला काही अर्थच नाही. हा विषय अत्यंत गंभीर आहे.” – पृथ्वीराज चव्हाण
या आरोपांवर निवडणूक आयोग किंवा मुख्य निवडणूक आयुक्तांकडून अजून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
*तुम्हाला काय वाटतं? निवडणूक आयोगाच्या कामकाजाची चौकशी व्हायला हवी का?*
#ElectionCommission #GyaneshKumar #PrithvirajChavan #IndianExpress #ECI #Democracy #MAIMEDIA24






















