Home मुंबई मारुती विश्वासराव यांना मातृशोक

मारुती विश्वासराव यांना मातृशोक

77
0

मारुती विश्वासराव यांना मातृशोक

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धी प्रमुख, पोर्ट ट्रस्ट कामगार दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक आणि सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव यांच्या मातोश्री गं.भा. भामाबाई किसन विश्वासराव यांचे वृद्धपकाळाने वयाच्या ८५ व्या वर्षी नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या पाठीमागे मारुती, रामहरी, नरहरी, दत्तात्रेय अशी चार मुले, पुष्पा आणि कमल अशा दोन मुली, नातवंडे, सूना असा मोठा परिवार आहे.

वडील किसन आणि आई भामा बाई यांनी आयुष्यात खूप कष्ट करून आपला संसार उभा केला. या कष्टाचे त्यांना चांगले फळ मिळाले .त्यांची चारही मुले मारुती मुंबई पोर्ट ट्रस्ट, रामहरी बेस्ट, नरहरी केंद्रीय राखीव पोलीस दल तर डॉ. दत्तात्रेय हे पशुवैद्यकीय डॉक्टर असून गावामध्ये आजही एकत्रित कुटुंब पद्धतीने राहत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here