Home पुणे *पीसीपीएनडीटी-एमटीपी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्कफोर्सच्या कामाला गती; ऑक्टोबरमध्ये कृती आराखडा तयार होणार*

*पीसीपीएनडीटी-एमटीपी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्कफोर्सच्या कामाला गती; ऑक्टोबरमध्ये कृती आराखडा तयार होणार*

47
0

*पीसीपीएनडीटी-एमटीपी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्कफोर्सच्या कामाला गती; ऑक्टोबरमध्ये कृती आराखडा तयार होणार*

*डॉ. नीलम गोऱ्हे यांची आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी चर्चा; विभागीय बैठका घेऊन महिलांच्या सूचनांचा समावेश करणार*

*पुणे, दि. २३ :* पीसीपीएनडीटी आणि एमटीपी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी तसेच महिलांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या टास्कफोर्सच्या कामाला गती देण्याच्या दृष्टीने विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेतली.

८ सप्टेंबर रोजी या टास्कफोर्सची स्थापना करण्यात आली असून, डॉ. गोऱ्हे यांची अध्यक्षपदी तर सहा महिला आमदारांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. या बैठकीत टास्कफोर्सच्या आगामी कामकाजाची दिशा, बैठकींचे नियोजन आणि प्राथमिक निष्कर्षांवर सविस्तर चर्चा झाली.

टास्कफोर्ससाठी आवश्यक प्रशासकीय व्यवस्था उपलब्ध करून देण्याबाबत आरोग्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली. ऑक्टोबर महिन्यात टास्कफोर्सची बैठक घेऊन प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले.

दुष्काळ, पाणीटंचाई आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्या या विषयांचाही अभ्यास टास्कफोर्स करणार असून, संबंधित मुद्दे इतर विभागांमार्फत मार्गी लावण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी समन्वय साधावा, अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केली.

राज्यभरातील महिला आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्या, संस्था यांच्याशी विभागनिहाय संवाद साधून त्यांच्या सूचना टास्कफोर्सच्या अहवालात समाविष्ट केल्या जाणार आहेत. काही बैठका ऑनलाईन पद्धतीनेही घेण्यात येणार आहेत.

या उपक्रमाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांच्या सूचनांचाही समावेश केला जाणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here