Home मुंबई गणेश मंडप बनले योजनांच्या जनजागृतीचे व्यासपीठ; ‘लोकसंवाद २०२६’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

गणेश मंडप बनले योजनांच्या जनजागृतीचे व्यासपीठ; ‘लोकसंवाद २०२६’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

58
0

गणेश मंडप बनले योजनांच्या जनजागृतीचे व्यासपीठ; ‘लोकसंवाद २०२६’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि. २३ सप्टेंबर – गणेशोत्सवाच्या पर्वावर भक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा संगम साधत माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘लोकसंवाद २०२६’ उपक्रमांतर्गत वांद्रे पूर्व येथील गणेश मंडपात शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली.

यावेळी उपस्थित नागरिकांना योजनांची पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि संबंधित कार्यालय याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. छायाचित्रात माहिती व जनसंपर्क विभागाचे अधिकारी, समाजकल्याण आणि कौशल्य विकास विभागाचे अधिकारी, मंडळाचे पदाधिकारी व नागरिक योजनांची माहिती पत्रके हातात घेऊन दिसत आहेत.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे यांच्या सहकार्याने जिल्ह्यात हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here