Home पालघर-ठाणे / नवी मुंबई / रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग *नागरिकांच्या चिंता जाणून घेत बाधित परिसराची ना. उदय सामंतांकडून पाहणी*

*नागरिकांच्या चिंता जाणून घेत बाधित परिसराची ना. उदय सामंतांकडून पाहणी*

57
0

*नागरिकांच्या चिंता जाणून घेत बाधित परिसराची ना. उदय सामंतांकडून पाहणी*

रत्नागिरी: विमानतळावर आयएलएस सिस्टीम बसवण्यासाठी सुमारे सात एकर जागा लागणार असून स्थानिकांची घरे आणि मंदिर बाधित होण्याची शक्यता आहे. याबाबत नागरिकांनी आज पालकमंत्री ना. उदय सामंत यांची भेट घेऊन चिंता व्यक्त केली.

नागरिकांशी चर्चा केल्यानंतर ना. सामंत यांनी अधिकाऱ्यांसोबत थेट विमानतळ परिसरात जाऊन प्रस्तावित जागा आणि बाधित होणाऱ्या घरांची प्रत्यक्ष पाहणी केली. केवळ कागदावरील नकाशे पाहून निर्णय घेण्यापेक्षा प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

विमानतळाचा विकास महत्त्वाचा आहे, मात्र विकासाच्या नावाखाली स्थानिकांचे घर किंवा मंदिर तोडले जाणार नाही, अशी ग्वाही ना. सामंत यांनी दिली.

आयएलएससाठी पर्यायी पर्याय तपासण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या असून दमण विमानतळावरील सिस्टीमचा रत्नागिरीसाठी उपयोग होऊ शकतो का, याबाबत तपासण्यास सांगितले आहे.

विकास आणि स्थानिकांचे हक्क यांचा समतोल साधूनच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले.

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here