Home मुंबई *IIT Bombay मधील विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी मुंबई काँग्रेसचे तीव्र आंदोलन*

*IIT Bombay मधील विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी मुंबई काँग्रेसचे तीव्र आंदोलन*

56
0

*IIT Bombay मधील विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी मुंबई काँग्रेसचे तीव्र आंदोलन*

मुंबई: IIT बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्ये प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसने आज IIT बॉम्बे समोर तीव्र आंदोलन केले.

साहिल वाकोडेच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांवर निष्पक्ष व पारदर्शी कारवाई झाली पाहिजे आणि जबाबदार प्राध्यापकांना सेवेतून बरखास्त करावे, अशी मागणी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष झीनत शबरीन यांनी केली आहे.

झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात युवक काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत कार्यकर्त्यांची धरपकड करून पोलीस स्टेशनला नेले.

यावेळी बोलताना झीनत शबरीन म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी या प्रकरणी १८ मागण्या केल्या असून त्या सर्व मागण्यांना युवक काँग्रेसचा पाठिंबा आहे. IIT बॉम्बे येथील जात-आधारित छळाच्या आरोपांचीही सखोल चौकशी करावी. यापूर्वीही या संस्थेतील तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे संस्थात्मक उत्तरदायित्व, मानसिक आरोग्य समुपदेशन, तक्रार निवारण यंत्रणा बळकट करावी, अशी मागणी त्यांनी केली.

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here