*UPI वर शुल्क आकारणी म्हणजे जनतेच्या खिशावर दरोडा – विजय वडेट्टीवार यांचा भाजप सरकारवर घणाघात!*
*कॅशलेसच्या नावाखाली डिजिटलची सवय लावायची आणि नंतर टॅक्सच्या नावाने फास आवळायचा – काँग्रेस नेते आक्रमक*
मुंबई – केंद्रातील भाजप सरकारच्या UPI व्यवहारांवर MDR शुल्क आकारणीच्या निर्णयावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. (X Post – https://x.com/VijayWadettiwar/status/2099784625769812190)
वडेट्टीवार म्हणाले की, “कॅशलेस व्यवस्थेच्या नावाखाली जनतेला डिजिटल व्यवहारांची सवय लावायची आणि लोक त्यावर पूर्णपणे अवलंबून झाल्यावर गुपचूप टॅक्सच्या नावाने फास आवळायचा, हाच भाजप सरकारचा छुपा अजेंडा आता उघडा पडला आहे.”
“आधी नोटाबंदीचा तडाखा देऊन लोकांना रांगेत उभे केले, नंतर डिजिटल इंडियाचा गवगवा करत प्रत्येक व्यवहारासाठी UPI वापरायला भाग पाडले आणि आता दोन हजारांच्या वरच्या व्यवहारांवर शुल्क आकारणीचा डाव मांडून सर्वसामान्यांच्या उरल्यासुरल्या बचतीवर डल्ला मारण्याचे काम सुरू झाले आहे,” असा आरोप त्यांनी केला.
व्यापाऱ्यांवर लादल्या जाणाऱ्या MDR चा अंतिम भुर्दंड बाजारातील महागाईच्या रूपाने शेवटी शेतकरी, कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांच्याच माथ्यावर मारला जाणार असल्याचेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
*टॅग्स:* #VijayWadettiwar #UPICharges #MDR #BJP #MAIMEDIA24 #ProShittalKardekar
*सोर्स लिंक:* https://x.com/VijayWadettiwar/status/2099784625769812190
—






















