Home मुंबई *गणेशोत्सवातून महाराष्ट्राची परंपरा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई*

*गणेशोत्सवातून महाराष्ट्राची परंपरा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई*

65
0

*गणेशोत्सवातून महाराष्ट्राची परंपरा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई*

*मुंबई, दि. 16:* गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जागतिक महोत्सव आहे, असं प्रतिपादन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केलं.

यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने तब्बल 8 देशांच्या वाणिज्यदूतांनी मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळांना भेट देत बाप्पाचं दर्शन घेतलं!

*कोण-कोण आले होते दर्शनाला?*
फिनलंड, फ्रान्स, थायलंड, नॉर्वे, चीन, बेल्जियम, स्वीडन आणि इजिप्त या देशांचे वाणिज्यदूत!

*कोणत्या मंडळांना भेट दिली?*
– माटुंगा GSB गणपती
– वडाळा GSB सार्वजनिक गणेशोत्सव
– गणेश गल्लीचा ‘मुंबईचा राजा’
– गिरगावातील ऐतिहासिक केशवजी नाईक चाळ

माटुंगा येथील खालसा महाविद्यालयात सर्व परदेशी पाहुण्यांचं पारंपारिक फेटा बांधून स्वागत करण्यात आलं. त्यांना गणेशोत्सवाचा इतिहास, लोकमान्य टिळकांची परंपरा आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला.

मंत्री देसाई म्हणाले, _”गणेशोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची कला, परंपरा आणि आतिथ्यशीलता जगभर पोहोचत आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन विभाग विशेष उपक्रम राबवत आहे.”_

या कार्यक्रमाला राज्यमंत्री इंद्रनील नाईक, अपर मुख्य सचिव संजय खंदारे, जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि MTDC चे MD निलेश गटणे उपस्थित होते.

*#Ganeshotsav2025 #ShambhurajDesai #MaharashtraTourism #MumbaiChaRaja #GSB #MAIMedia24 #CulturalMaharashtra*

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here