Home उद्योग / शिक्षण वार्ता ऑफलाईन, अनधिकृत प्रवेश देणाऱ्या कॉलेजांवर कारवाई होणार – शिक्षण संचालनालयाचे कडक निर्देश

ऑफलाईन, अनधिकृत प्रवेश देणाऱ्या कॉलेजांवर कारवाई होणार – शिक्षण संचालनालयाचे कडक निर्देश

25
0

ऑफलाईन, अनधिकृत प्रवेश देणाऱ्या कॉलेजांवर कारवाई होणार – शिक्षण संचालनालयाचे कडक निर्देश

*मुंबई, दि. ७ -* इयत्ता ११ वीचे प्रवेश फक्त आणि फक्त केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतूनच करावे लागणार आहेत. मंजूर क्षमतेपेक्षा जास्त किंवा ऑफलाईन पद्धतीने अनधिकृत प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांवर आता थेट कारवाई होणार असल्याचा कडक इशारा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने दिला आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार २०२५-२६ पासून राज्यभरात इयत्ता ११ वीचे सर्व प्रवेश ऑनलाईन प्रणालीद्वारेच बंधनकारक करण्यात आले आहेत. असे असतानाही काही कनिष्ठ महाविद्यालये ऑफलाईन पद्धतीने जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देत असल्याचे निदर्शनास आले आहे.

अशा अनधिकृत प्रवेशांमुळे विद्यार्थ्यांना पुढे इयत्ता १२ वीच्या बोर्डाच्या अर्ज प्रक्रियेत अडचणी येतात आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान होते.

या पार्श्वभूमीवर कोणत्याही महाविद्यालयाने ऑफलाईन प्रवेश देऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश शिक्षण उपसंचालकांना देण्यात आले आहेत.

*नियम मोडल्यास काय होणार?*
या सूचनांचे उल्लंघन केल्यास संबंधित महाविद्यालय आणि मुख्याध्यापकांविरुद्ध महाराष्ट्र कर्मचारी खासगी शाळा (सेवेच्या शर्ती) अधिनियम, १९७७ व नियमावली १९८१ नुसार कारवाई प्रस्तावित केली जाईल, असा इशारा शिक्षण संचालकांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here