Home पुणे *शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार*

*शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार*

39
0

*शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार*

*पुणे, दि. ५ सप्टेंबर -* शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणे, ही सक्षम आणि ज्ञानसमृद्ध समाजाच्या उभारणीची भक्कम पायाभरणी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भावना व्यक्त केली.

आज शिक्षक दिनानिमित्त श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, पुणे येथे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार, अध्यक्ष चषक आणि शिष्यवृत्ती परीक्षेतील राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला.

यावेळी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आदर्श शिक्षकांचा आणि शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

*अजितदादांचे स्वप्न पुढे नेणार – सुनेत्रा पवार*

महाराष्ट्राच्या विकासात शिक्षणाला नेहमीच अग्रक्रम देण्याची भूमिका अजितदादांची होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार, आधुनिक आणि जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे, हे त्यांचे स्वप्न होते. पुणे मॉडेल स्कूल, डिजिटल शिक्षण आणि विविध आधुनिक शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून हा विचार पुढे नेण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.

*पुणे – शिक्षणाची पंढरी*

पुणे ही शिक्षणाची पंढरी आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेला शिक्षणाचा समृद्ध वारसा आज जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून पुढे नेला जात आहे. या शाळांमध्ये शिकणारी मुलं ही ग्रामीण महाराष्ट्राची खरी ताकद आहेत.

बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान न देता कौशल्याधारित आणि मूल्याधारित शिक्षणासोबत *डिजिटल शिक्षण आणि AI साक्षरतेची जोड* देणे आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या. हाच तर *कालानुरूप बदल!*

गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या यशाची परंपरा पुढे न्यावी आणि शिक्षकांनी ज्ञानदानाचे पवित्र कार्य अधिक जोमाने सुरू ठेवावे, यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

*- MAI MEDIA 24 साठी – संपादक: शीतल हरीश करदेकर*

#SunetraPawar #TeachersDay #ShikshakDin2026 #Pune #AjitDada #KalanurupBadal #MAIMedia24

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here