*मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली अण्णा हजारे यांची रुग्णालयात सदिच्छा भेट!*
माहिती अधिकाराचे प्रणेते, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे प्रकृती अस्वास्थतेमुळे मुंबईत बाँबे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी आज त्यांची बाँबे हॉस्पिटल येथे भेट घेतली.
हजारे यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. अण्णांची तब्येतीत सुधारणा होत आहे, हे जाणून घेतल्यावर समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी उपचार देणाऱ्या डॉक्टरांशीही चर्चा केली. निरामय व दीर्घायू आयुष्याची कामना केली.
विशेष म्हणजे, अण्णा हजारे यांनी माहिती अधिकार कायद्याच्या अमलबजावणीबाबत यावेळी चर्चा केली. कामकाजातील प्रगती बघून महाराष्ट्रील काम लोकाभिमुख असल्याची शाबासकी दिली. दोघांमध्ये सुमारे दहा मिनिटे चर्चा झाली. यावेळी आयोगाचे सचिव रविराज फल्ले, ज्येष्ठ संपादक रघुनाथ पांडे, दत्ता आवारे, सुनील हजारे, सुरेश पठारे, लाभेश औटी उपस्थित होते.





















