Home मुंबई * मोहन भागवत यांची अमेरिकेत एक भाषा, भारतात दुसरी? RSS चे बदललेले...

* मोहन भागवत यांची अमेरिकेत एक भाषा, भारतात दुसरी? RSS चे बदललेले विचार BJP स्वीकारणार का? – महेश तपासे यांचा सवाल*

30
0

* मोहन भागवत यांची अमेरिकेत एक भाषा, भारतात दुसरी? RSS चे बदललेले विचार BJP स्वीकारणार का? – महेश तपासे यांचा सवाल*

*मुंबई -* न्यूयॉर्कच्या मेडिसन स्क्वेअर गार्डन येथे पार पडलेल्या कार्यक्रमात RSS प्रमुख मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) चे प्रवक्ते महेश तपासे यांनी जोरदार टीका केली आहे.

महेश तपासे म्हणाले, “भागवत साहेबांनी अमेरिकेत Universal Brotherhood आणि Unity in Diversity चा दाखला दिला. RSS च्या या बदललेल्या विचारांचे स्वागत भाजप त्यांच्या राजकारणात करेल का? हा खरा प्रश्न आहे.”

“महाराष्ट्रात भाजपचे युवा मंत्री सातत्याने मुसलमानांवर टीका करतात, आंतरधर्मीय लग्नाला लव्ह जिहाद म्हणतात. अशा मंत्र्यांना RSS प्रमुख समज देणार का? परदेशात जाऊन Diversity ची संकल्पना मांडणे सोपे आहे, पण भारतात, दिल्लीत, उत्तर प्रदेशातही तेच वक्तव्य करावे लागेल. जे आमदार, खासदार, मंत्री मुसलमानांना टार्गेट करतात, त्यांच्यावर काय कारवाई करणार हे स्पष्ट करावे,” असेही तपासे म्हणाले.

*व्हिडिओ सोबत पोस्ट करण्यासाठी कॅप्शन:*
अमेरिकेत एक भाषा, भारतात दुसरी? भागवतांचे विचार भाजप स्वीकारणार का? – महेश तपासे | MAI MEDIA 24

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here