*मनमानी शुल्काला पूर्णविराम द्या, लूट करणाऱ्या संस्थांवर कारवाई करा – ॲड. अमोल मातेले*
*मुंबई | MAI MEDIA 24*
खाजगी विद्यापीठांच्या मनमानी शुल्कवसुलीला तात्काळ पूर्णविराम द्यावा आणि विद्यार्थ्यांची लूट करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) चे नेते ॲड. अमोल मातेले यांनी केली आहे.
दिल्लीतील जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या ऐतिहासिक आंदोलनानंतर राज्य सरकारला जाग आली असून FRA कायद्यात सुधारणा करण्याच्या हालचाली सुरू आहेत. यावर प्रतिक्रिया देताना मातेले म्हणाले, “हे भ्रष्ट आणि टक्केवारी सरकार आहे. त्यांच्या नाकावर टिच्चून विद्यार्थ्यांनी विजय मिळवला आहे. सरकारला उशिरा शहाणपण सुचले आहे.”
आगामी अधिवेशनातच FRA कायद्यात ठोस सुधारणा करून सर्व खाजगी विद्यापीठांना FRA च्या कक्षेत आणावे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
—





















