Home नागपूर *पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही तर सत्ताधारी जबाबदार – वडेट्टीवारांचा गंभीर आरोप*

*पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही तर सत्ताधारी जबाबदार – वडेट्टीवारांचा गंभीर आरोप*

8
0

*पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही तर सत्ताधारी जबाबदार – वडेट्टीवारांचा गंभीर आरोप*
*MPSC अध्यक्षांच्या पार्श्वभूमीची चौकशी करा, परीक्षा ऑफलाईन घ्या – मागणी*

*नागपूर, दि. २७ -* महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असून आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा पेपर लव्ह स्टोरीमध्ये फुटलेला नाही तर यात सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

MPSC च्या वर्ग-१ आणि वर्ग-२ च्या अनेक जागांवर सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप झाल्याचा आरोप करत वडेट्टीवार म्हणाले, MPSC ला स्वच्छ करण्याची गरज आहे. आयोगाच्या अध्यक्षांची पार्श्वभूमी तपासली पाहिजे. अध्यक्ष आरटीओ विभागातून सेवानिवृत्त झालेले असल्याने त्यांच्या प्रशासकीय पार्श्वभूमीची तपासणी झाली पाहिजे.

आरोग्य विभागातील वर्ग-१ ते वर्ग-४च्या नियुक्त्यांची जबाबदारी MPSC कडे सोपवण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी केला. सर्व पेपर ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन घ्यावेत. वर्ग-3 आणि वर्ग-4 ची भरती जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली तरच गडबड थांबेल, असे ते म्हणाले.

राज्य उत्पादन शुल्क भरतीतील गैरप्रकारावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. निवड झालेल्यांना नियुक्ती न देणे आणि पदोन्नतीतील गोंधळामुळे अनेक पदे रिक्त आहेत. यात संबंधित अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, सरकारने जीआर रद्द केला असला तरी अनेक मागण्या प्रलंबित आहेत. मागील वर्षी आदिवासी विभागाच्या तरतुदीपैकी केवळ २९% निधी खर्च झाला. आदिवासींसाठीचा निधी दुसरीकडे वळवण्याचा अधिकार आहे का? असा सवाल त्यांनी केला.

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या वक्तव्यावर टोला लगावताना ते म्हणाले, झिरवळ खाऊन-पिऊन आंदोलन करा असे म्हणत असतील कारण ते देखील खाऊन-पिऊनच सर्व करतात.

आरटीओ विभागातील गैरप्रकाराबाबत म्हणाले, खोटे ट्रॅप करून एसीबी कारवाईचा गैरवापर होत आहे. गैरप्रकार पुन्हा सुरू झाला तर सोडणार नाही, दोषींवर कारवाई करायला भाग पाडू, असा इशारा त्यांनी दिला.


MAI MEDIA 24 Bureau, नागपूर*

*कॅप्शन:*
ब्रेकिंग – पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही तर सत्ताधारी जबाबदार – वडेट्टीवार
#MPSC #PaperLeak #VijayWadettiwar #MAIMEDIA24

*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here