Home मुख्य बातम्या *चोरी, घरफोडीतील सराईत तिघे जवाहरनगर पोलिसांच्या जाळ्यात – ४ गुन्हे उघड, १.२५...

*चोरी, घरफोडीतील सराईत तिघे जवाहरनगर पोलिसांच्या जाळ्यात – ४ गुन्हे उघड, १.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त*

29
0

*Maimedia24*
छत्रपती संभाजीनगर क्राईम*

*चोरी, घरफोडीतील सराईत तिघे जवाहरनगर पोलिसांच्या जाळ्यात – ४ गुन्हे उघड, १.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त*

*छत्रपती संभाजीनगर, दि. २० ऑगस्ट*

चोरी, घरफोडी आणि लुटमारीसारख्या गंभीर गुन्ह्यातील सराईत आरोपींना जवाहरनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून ४ गुन्हे उघडकीस आले असून सुमारे *१ लाख २५ हजार रुपयांची मोटारसायकल व अन्य मुद्देमाल जप्त* करण्यात आला आहे.

*घटना १ – योगेश्वरी अपार्टमेंट फोडी*
७ ऑगस्ट रोजी रात्री योगेश्वरी अपार्टमेंट परिसरात घरफोडी करून टेपरेकॉर्डर चोरीला गेला होता. फिर्यादी सुनील रवींद्र यांनी दिलेल्या तक्रारीवरून *गु.र.नं. ३२९/२०२६ कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) BNS* अन्वये गुन्हा दाखल होता.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी *शेख आदिल शेख जावेद (रा. शंभुनगर) व अरफात शेख अतिक शेख (रा. देवानगरी)* यांना ताब्यात घेतले. न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी दिल्यानंतर त्यांनी आणखी गुन्ह्यांची कबुली दिली.

*तपासातून आणखी ३ गुन्हे उघड -*

*१. कृषी विभाग कार्यालय चोरी -* उल्कानगरी येथील कृषी विभाग कार्यालयातून इन्व्हर्टर व बॅटरी चोरी. *गु.र.नं. ३१५/२०२६ कलम ३०३(२), ३(५) BNS.* यात *अर्जुन केसरसिंग राजपूत (रा. शंभुनगर)* चा सहभाग निष्पन्न.

*२. लॉर्ड हॉल परिसरातील भांडी चोरी -* सातारा हद्दीतील जैन शाळेजवळील लॉर्ड हॉल परिसरातून तांब्या-पितळेची भांडी चोरी. *सातारा पो.स्टे. गु.र.नं. ५२५/२०२६ कलम ३०५(अ) BNS.* यात फरार व तडीपार आरोपी *आमिर आयुब शेख (रा. इंदिरानगर), शेख रिझवान शेख रहेमान व जाहेद बागवान (दोघे रा. शंभुनगर)* यांचा सहभाग.

*३. राजेशनगर बायपास घरफोडी -* पुंडलिकनगर हद्दीतील राजेशनगर बायपास परिसरातील घरफोडी. *पुंडलिकनगर पो.स्टे. गु.र.नं. ३७०/२०२६ कलम ३०५, ३३१(४) BNS.*

*सराईत गुन्हेगार -*
शेख आदिल विरोधात चोरी, घरफोडी, लुटमारीचे ५ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे, तर फरार आमिर आयुब शेख विरोधात १० पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

*कारवाई -*
पोलीस आयुक्त प्रविण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या नेतृत्वात *PSI रावसाहेब वाघ, अनिल भाले, देगलूर, उपाध्याय, मारोती गोरे व राजू शिंदे* यांनी ही कामगिरी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here