Home पुणे *डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानी विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांची सदिच्छा भेट;डॉ....

*डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानी विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांची सदिच्छा भेट;डॉ. गोऱ्हे यांच्याकडून अहिर यांचा सत्कार*

9
0

*डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानी विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांची सदिच्छा भेट;डॉ. गोऱ्हे यांच्याकडून अहिर यांचा सत्कार*

पुणे.दि.३: महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान उपसभापती सचिन अहिर यांनी सोमवारी शिवसेना नेत्या व महाराष्ट्र विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील ‘सिल्व्हर रॉक्स’ या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी श्रीगणेशाची मूर्ती, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन श्री. अहिर यांचा सन्मान केला. तसेच, श्री.अहिर यांनीही डॉ. नीलम गोऱ्हे यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.

या भेटीदरम्यान विधान परिषदेचे कामकाज अधिक प्रभावी, लोकाभिमुख आणि परिणामकारक करण्याबाबत तसेच संसदीय परंपरा आणि सभागृहाची गुणवत्ता अधिक बळकट करण्याच्या विविध पैलूंवर दोन्ही नेत्यांमध्ये विचारविनिमय करण्यात आला. तसेच, शिवसेना पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तळागाळातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सातत्यपूर्ण संवाद, शासनाच्या लोककल्याणकारी योजना याबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

यावेळी शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद (नाना) भानगिरे, युवासेना प्रदेश सचिव किरण साळी, आनंद गोयल, हेमंत बागुल, संदीप शिंदे, महिला आघाडीच्या कांताताई पांढरे, पूजा रावेतकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
——

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here