Home मुंबई *राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती...

*राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी…*

7
0

मुंबई दि. १ ऑगस्ट – राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज साजरी करण्यात आली.

सकाळी गिरगाव चौपाटी येथे जाऊन लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले आणि त्यानंतर प्रदेश कार्यालयात अण्णाभाऊ साठे आणि टिळकांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार सना मलिक-शेख, मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, कार्यालयीन सचिव संजय तटकरे आदींसह मुंबईचे सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here