*साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती महानगरपालिकेत साजरी*
साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनात अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आज (दिनांक ०१ ऑगस्ट २०२६) पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
सी व डी प्रभाग समिती अध्यक्ष आकाश पुरोहित, प्रमुख लेखापाल (वित्त) अरूण जाधव, महानगरपालिका उप सचिव प्रियांका देसाई आदी याप्रसंगी उपस्थित होते.
***




















