*`लोकमान्य बाळ गंगाधर टिळक : स्वराज्याची मशाल`* `🚩` `✊`
●`१. प्रस्तावना`●
१ ऑगस्ट १९२०. मुंबईत एक आवाज शांत झाला, पण कोट्यवधी लोकांच्या मनात `स्वराज्याची` आग लावून गेला.
`केसरी` ची शाई, `गीतारहस्य` चे तत्त्वज्ञान आणि `गणेशोत्सव` ची एकता – हे तिन्ही एकाच नावात होते – •`लोकमान्य बाळ गंगाधर टिळक`•
ब्रिटिशांनी ज्यांना `असंतोषाचे जनक` म्हटलं, त्यांनाच जनतेने `लोकमान्य` म्हणून डोक्यावर घेतलं `🚩`
●२. टिळकांचे जहाल वेगळेपण`
टिळक काँग्रेसच्या `जहाल गटाचे` नेते होते. `लाल-बाल-पाल` या त्रिपुटीने स्वातंत्र्य लढ्याला गती दिली.
मवाळ नेते `अर्ज-विनंती` करत होते, तेव्हा टिळक म्हणाले `भिक नको, हक्क हवा`.
`स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!`
म्हणूनच रँडच्या जुलमावर `केसरी` मधून प्रहार केला. म्हणूनच १८महिने जेल भोगली
●३. असंतोषाचे जनक`
ब्रिटिश लेखक व्हॅलेंटाईन चिरोल यांनी टिळकांना `Father of Indian Unrest` म्हटलं.
पण टिळकांसाठी `असंतोष` म्हणजे `अन्यायाविरुद्धचा संताप` होता.
प्लेगच्या नावाखाली होणाऱ्या जुलमाविरुद्ध, गुलामीविरुद्धचा आवाज होता.हाच असंतोष नंतर जनजागृती आणि स्वातंत्र्य चळवळ बनला
●. त्यांची चतु:सूत्री`* `4️⃣` `📜`
१. `स्वदेशी`- परदेशी मालावर बहिष्कार `🏭`
२.`बहिष्कार` – ब्रिटिश संस्था, कोर्ट यावर बहिष्कार `🚫`
३. `राष्ट्रीय शिक्षण` – आपला इतिहास शिकवणाऱ्या शाळा `📚`
४ *`स्वराज्य`* – अंतिम ध्येय `🇮🇳`
●`५. टिळकांचे पत्रकार म्हणून वेगळेपण` `📰` `✍️`
१८८१ मध्ये `केसरी – मराठी` आणि `मराठा – इंग्रजी` वर्सुतमानपत्र सुरू केली.
टिळकांची पत्रकारिता म्हणजे `बातमी` नव्हती, ती `चळवळ` होती.
`सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?` सारखे जहाल अग्रलेख लिहिले .
तेव्हा `केसरी`, आज `मोबाईल` – पण तत्त्व तेच `सत्तेला जाब विचारणे` `💯`
*`६. टिळक – आगरकर : वैचारिक वाद`* `⚡` `🤝`
दोघेही `न्यू इंग्लिश स्कूल` आणि `फर्ग्युसन कॉलेज` चे संस्थापक. दोघेही देशभक्त.
पण एका प्रश्नावर मतभेद – `आधी काय? राजकीय स्वातंत्र्य की सामाजिक सुधारणा?`
● दोघांची`मुद्देवार तुलना`●
`मुद्दा`** `लोकमान्य टिळक`-`गोपाळ गणेश आगरकर`
`प्राधान्यक्रम`आधी `स्वराज्य`, मग समाजसुधारणा ` हे टिळकांचे मत तर आधी `समाजसुधारणा`, मग स्वराज्याला अर्थ “ हे आगरकरांचे मत
`सुधारणांची पद्धत` काय तर टिळक -ब्रिटिशांनी कायद्याने लादू नये तर आगरकर- अनिष्ट रूढींवर कायद्याने बंदी हवी म्हणत होते. `वृत्तपत्र` – टिळकांचे `केसरी` – राजकीय जागृती `📰` आगरकरांचे `सुधारक` – सामाजिक जागृती `📖` साठी लिखाण करत राहिले ठामपणे.
●दोन मोठे प्रसंग ज्यामुळे वाद पेटला`●
●अ .संमती वयाचा कायदा – Age of Consent Act १८९१`* `👧`
`प्रकरण काय तर ब्रिटिशांनी कायदा आणला – मुलीच्या लग्नानंतर शारीरिक संबंधासाठी किमान वय १०वरून १२ करायचं.
*`आगरकर`* : पूर्ण समर्थन `✅`. लहान वयात मातृत्वामुळे मुलींचं शोषण थांबवण्यासाठी कायदा गरजेचा.
*`टिळक`* : विरोध `🚫`. कायदा वाईट नाही, पण `ख्रिश्चन ब्रिटिशांनी हिंदू धर्मात हस्तक्षेप करू नये`. आज कायद्याने, उद्या धर्मात. टिळक बालविवाहाचे समर्थक नव्हते.
●ब. फर्ग्युसन कॉलेजमध्ये मुलींना प्रवेश`
प्रकरण` : १८९०च्या सुमारास फर्ग्युसनमध्ये मुलींना सह-शिक्षण द्यायचा प्रस्ताव करायचा होता.
`आगरकरांचे याला ठाम समर्थन होते`. `स्त्री शिक्षणाशिवाय देशाचा उद्धार नाही`. समाज काय म्हणेल याचा विचार नको असे ठाम मत होते.
`टिळकांचा सुरुवातीला विरोध होता`. कारण वैचारिक नव्हत, व्यावहारिक होत. `समाज अजून तयार नाही. संस्थाच बदनाम होऊन बंद पडेल` म्हणून आधी मानसिकता बदला असे त्यांचे मत होते.
*`वादाचा शेवट`* : १८८७ मध्ये आगरकरांनी `केसरी` सोडलं. १८९५ मध्ये त्यांचे निधन झाले.
टिळकांनी `केसरी` मध्ये `एक सुप्रसिद्ध महाराष्ट्रीय` लिहून आगरकरांबद्दल आदर व्यक्त केला “
●`७. टिळकांचे योगदान` `💯` `🚩`
१. `राजकीय` : स्वराज्याचा नारा आणि जहाल चळवळीचा पाया.
२. सामाजिक`: १८९३ सार्वजनिक गणेशोत्सव, १८९५ शिवजयंती – समाजाला एकत्र आणलं `
३. ‘शैक्षणिक` : डेक्कन एज्युकेशन सोसायटी, फर्ग्युसन कॉलेज `🎓`
४ “साहित्यिक` मंडालेच्या जेलमध्ये `गीतारहस्य`, `The Arctic Home in the Vedas` `📖`
●`शेवटचं वाक्य`
टिळक गेले, पण प्रश्न तसाच आहे.
काल `स्वराज्य` पाहिजे होतं, आज `सुराज्य` पाहिजे आहे `💭
सुराज्य हा आमचा जन्मसिद्ध अधिकार तो आम्ही मिळवणारच! ` – हीच लोकमान्य टिळकांना मानवंदना!
– `शीतल हरीश करदेकर`
`( लेक- इटकरे ,वाळवा, सांगली )`
`#लोकमान्यटिळक #1ऑगस्ट #स्वराज्य #केसरी #टिळक_आगरकर #Maharashtra`
–




















