लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वराज्यभूमी (गिरगांव चौपाटी) येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्यास विधान परिषदेचे उप सभापती सचिन अहिर यांनी आज (दिनांक ०१ ऑगस्ट २०२६) पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.
महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, सी व डी प्रभाग समिती अध्यक्षआकाश पुरोहित, स्थानिक नगरसेविका स्नेहलता तेंडुलकर, ‘डी’ विभागाचे सहायक आयुक्त संतोष साळुंखे, महानगरपालिका उप सचिव प्रियांका देसाई, लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश सिलम, समितीचे सल्लागार तथा बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी महानगरपालिका आयुक्त जयराज फाटक यांच्यासह विविध मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
***




















