बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीच्या वतीने सर्व बेस्ट सेवानिवृत्त कामगारांना कळविण्यात येते की, **१ जून २०२४ पासून सेवानिवृत्त झालेल्या कामगारांची रखडलेली ग्रॅज्युटी व इतर सर्व देणी व्याजासह एकरकमी देण्यात यावीत**, तसेच खालील प्रमुख मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
**प्रमुख मागण्या :**
* रखडलेली ग्रॅज्युटी व इतर सर्व देणी व्याजासह एकरकमी अदा करण्यात यावीत.
* सर्व बेस्ट सेवानिवृत्त कामगारांना मोफत बस पास देण्यात यावा.
* सर्व सेवानिवृत्त कामगारांना मोफत आजीवन वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
* बेस्ट सेवानिवृत्त कामगारांच्या मुलांना बेस्टमधील भरती प्रक्रियेत प्रथम प्राधान्य देण्यात यावे.
या सर्व मागण्यांबाबत प्रशासनाने **लेखी स्वरूपात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता व्हावी**, यासाठी आपण सर्वांनी या भव्य मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकजूट दाखवावी.
**चला, आजी-माजी बेस्ट कामगारांनी बहुसंख्येने उपस्थित राहून आपल्या हक्काच्या लढ्याला बळ देऊया!**
**प्रमुख सल्लागार*
**मनोहर जुन्नरे**
**बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समिती**
सोमवार, २७ जुलै २०२६ सकाळी ठीक ११ वाजतापौर्णिमा सभागृह, मच्छी मार्केटजवळ, डोंबिवली रेल्वे स्टेशनजवळ, डोंबिवली (पश्चिम).


















