Home उद्योग / शिक्षण वार्ता *कामगार मंत्र्यांच्या निषेधार्थ विडी कामगार हक्क समितीचेभीक मागो आंदोलन*

*कामगार मंत्र्यांच्या निषेधार्थ विडी कामगार हक्क समितीचेभीक मागो आंदोलन*

30
0

महाराष्ट्र राज्यातील विडी कामगारांना २३ जून रोजी मजुरी वाढीचा निर्णय जाहीर करणार असे कामगार मंत्री आकाश फुंडकर साहेब यांनी २ जून च्या बैठकीत जाहीर केले होते. परंतु २२ जून पासून महाराष्ट्र राज्याचे अधिवेशन सुरू झाले तो अधिवेशन १४ दिवस चालून १० जुलै रोजी समाप्त झाला. परंतु अधिवेशनात विडी कामगारांच्या किमान वेतन विषयी चर्चा देखील झाले नाही व किमान वेतन देखील कामगार मंत्र्यांनी जाहीर केले नाही, म्हणून कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या निषेधार्थ कामगार सेनेचे प्रदेश सचिव विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली साईबाबा चौकातील विजय नगर येथे सोमवारी दिनांक १३जुन रोजी भीक मांगो आंदोलन छेडण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉ. गोवर्धन सुंचू ,नवमहाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष सायबण्णा तेगेळ्ळी, राष्ट्रीय मजदूर संघ इंटकचे राहुल गुजर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ.गोवर्धन सुंचू यांनी बोलताना म्हणाले की ,कामगार मंत्री यांच्या नेतृत्वाखाली अनेक बैठका झाल्या.सर्व कामगार संघटनेला प्रस्ताव देण्यास सांगितले. त्याप्रमाणे वरील चारही संघटने कडून विडी कामगारांना दर हजार विड्यामागे ३५० ते ४०० रुपये मजुरी वाढ करण्यात यावा असे कामगार मंत्र्याकडे प्रस्ताव देण्यात आला. यावेळी मंत्रिमहोदयांनी अधिवेशन सुरू झाल्याबरोबर २३ जून रोजी किमान वेतन जाहीर करणार आहे असे त्यावेळी बोलले होते. परंतु अधिवेशन देखील संपले.परंतु वेळी कामगारांचा किमान वेतन काही जाहीर झालेली नाही म्हणून कामगार मंत्र्यांचा निषेधार्थ हक्क समितीच्या वतीने भिक मागो आंदोलन करीत आहोत.तरी त्वरित कामगार मंत्री महोदयांनी किमान वेतन जाहीर करावा. अन्यथा याहीपेक्षा उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा डॉ. गोवर्धन सुंचू यांनी दिला.
यावेळी विष्णू कारमपुरी (महाराज) म्हणाले की आम्ही वरील चारही संघटनेच्या वतीने अनेक वेळा कामगार मंत्र्यांना निवेदने दिले होते. त्यानंतर तीन ते चार वेळा मंत्रालयात व कामगार आयुक्त बांद्रा कुर्ला संकुल या ठिकाणी बैठका झाले त्यानंतर मंत्र्यांनी सांगितले की २३ जून रोजी विडी कामगारांना आनंदाची बातमी देऊ असे आश्वासन दिले होते. परंतु चक्क कामगार मंत्राकडून विडी कामगारांना काहीही मिळाले नाही. उलट उद्योगांना पाठिंबाच आहे असेच दिसून येते. विडी कामगारांना गेल्या १२ वर्षापासून कुठल्याही कामगार मंत्राकडून न्याय मिळताना दिसत नाही. या कामगार मंत्र्यांकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु याही कामगार मंत्र्यांनी विडी कामगारांना केराची टोपली दाखवली. व विडी कामगारावर अन्याय केला .परंतु हक्क समितीच्या वतीने विडी कामगारांना किमान वेतन मिळेपर्यंत अनेक आंदोलने छेडण्यात येईल, असे कारमपुरी (महाराज) यांनी व्यक्त केले
यावेळी सायण्णा तेगेळ्ळी, इंटकचे राहुल गुजर यांचीही भाषणे झाली.
यावेळी चंद्रकला गुजर, नंदिनी जिंदम ,मीनाक्षी मादास, रेखा आडकी, गुरुनाथ कोळी ,प्र साद जगताप, श्रीनिवास बोगा, बालाजी बुधारम ,विष्णू गुंडेटी, सोमनाथ कनकी, विष्णू म्हेत्रे, पप्पू शेख,विठ्ठल कुराडकर आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here