संविधानाची शपथ घेऊन सरकारी सेवेत प्रवेश करायचा आणि नंतर सार्वजनिक व्यासपीठावर एका विशिष्ट संघटनेचे गुणगान गायचे… हा निष्पक्ष प्रशासनाचा आदर्श आहे का?
आयपीएस अधिकाऱ्याची ओळख त्याच्या वर्दीने, कायद्यावरील निष्ठेने आणि संविधानाप्रती बांधिलकीने असावी, कोणत्याही राजकीय किंवा वैचारिक संघटनेप्रती सार्वजनिक निष्ठेने नाही. खाकी वर्दी ही कोणत्याही विचारधारेची प्रचारक नाही, ती भारतीय राज्यघटनेची रक्षक आहे.
ज्या पदावरून प्रत्येक नागरिकाकडे समान नजरेने पाहण्याची अपेक्षा असते, त्याच पदावरून एका विशिष्ट विचारसरणीची उघड बाजू घेणे हे प्रशासनाच्या आणि त्या पदाच्या तटस्थतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. लोकांचा विश्वास टिकवायचा असेल, तर वैयक्तिक विचार आणि अधिकृत जबाबदारी यामधील लक्ष्मण रेषा पाळावीच लागते.
बदली कुठेही झाली तरी सरकारी अधिकाऱ्याची निष्ठा संविधानाशी असावी. वर्दीवर संविधानाचा अशोकस्तंभ आहे. संविधान सर्वोच्च आहे. वर्दीची प्रतिष्ठा टिकवायची असेल, तर तटस्थता हीच खरी ओळख असली पाहिजे!



















