Home मुंबई *‘देवाभाऊ सहकार टॅक्सी‘ उपक्रमाबाबत* *आ. दरेकर व वाहनचालक-मालकांत बैठक*

*‘देवाभाऊ सहकार टॅक्सी‘ उपक्रमाबाबत* *आ. दरेकर व वाहनचालक-मालकांत बैठक*

9
0

मुंबई – ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या खासगी अँप्सना पर्याय म्हणून दिल्लीच्या ’भारत टॅक्सी‘च्या धर्तीवर मुंबई व एमएमआर रिजन परिसरात ’देवाभाऊ सहकार टॅक्सी‘ ही एक नवीन व परवडणारी टॅक्सी सेवा सुरु करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘देवभाऊ सहकार टॅक्सी’ उपक्रमाची माहिती देण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे व मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत टॅक्सी युनियनचे पदाधिकारी, वाहन चालक व मालक यांच्यात बैठक पार पडली.

’देवाभाऊ सहकार टॅक्सी‘ या उपक्रमाविषयी वाहन चालक व मालक विशेषतः महिला चालक यांच्या समस्या आणि सूचना समजून घेण्यासाठी आ. प्रवीण दरेकर यांनी मुंबई बँकेच्या फोर्ट येथील मुख्यालयात या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला मुंबई बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक संदीप सुर्वे, टॅक्सी युनियनचे पदाधिकारी, महिला टॅक्सी चालक आणि मालक उपस्थित होते. या बैठकीत ‘देवाभाऊ सहकार टॅक्सी‘ हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी वाहन चालक आणि मालक यांनी अतिशय चांगल्या सूचना केल्या. आ. प्रवीण दरेकर यांनीही या उपक्रमाचा उद्देश काय? त्याचा फायदा काय होणार आहे? मुंबई बँकेमार्फत या उपक्रमासाठी वाहन चालकांना कर्ज योजना कशी मिळणार? तसेच ’देवाभाऊ सहकार टॅक्सी‘ या अधिकृत संकेतस्थळावर चालकांनी अर्ज नोंदणी कशी करावी याबाबतची सखोल आणि सविस्तर माहितीही आ. दरेकरांनी वाहन चालक व मालक यांना दिली.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here