Home Trending Now ऑपरेशन टायगर: राऊतांचा आवाज, फडणवीसांची चाल? *शिवसेना (उबाठा) खासदारांच्या मातोश्रीच्या बैठकीला राऊत...

ऑपरेशन टायगर: राऊतांचा आवाज, फडणवीसांची चाल? *शिवसेना (उबाठा) खासदारांच्या मातोश्रीच्या बैठकीला राऊत उपस्थित नव्हतेच.”* व्यंगचित्रकार प्रशांत आष्टीकर यांचा गौप्यस्फोट – ” संजय राऊत पक्षातून काढल्यात जमा”*

95
0

“ऑपरेशन टायगर: राऊतांचा आवाज, फडणवीसांची चाल?”*
*शिवसेना (उबाठा) खासदारांच्या मातोश्रीच्या बैठकीला उपस्थित नव्हते.”*

*उपशीर्षक: व्यंगचित्रकार प्रशांत आष्टीकर यांचा गौप्यस्फोट – ” संजय राऊत पक्षातून काढल्यात जमा”*

*माईमीडिया24, मुंबई |

*’ऑपरेशन टायगर’ मध्ये संजय राऊत यांची भूमिका चर्चेत असतानाच, ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत आष्टीकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या ‘रणनीती’वर बोट ठेवले आहे.*

*”राऊत रोज सकाळी ‘पेन ड्राईव्ह’ दाखवायचे, संध्याकाळी ईडी यायची. पण भाजपचा एकही आमदार फुटला नाही. उलट UBT चे ४० आमदार गेले. हे ‘ऑपरेशन’ कोणाचं होतं?” असा सवाल आष्टीकर करतात.

*”आज संजय राऊत यांनाच पक्षाकडून साईडलाईन केले जात आहे, अशी चर्चा जोरदार आहे.*
*दिल्लीच्या मविआ बैठकीत संजय राऊत नव्हते. ज्यांनी ‘टायगर’ च्या नावाने गर्जना केल्या, त्यांचा आवाज आता ‘ऑपरेशन लांडगा’ पुरता मर्यादित राहिलाय!*
तर सगळ्यात महत्वाचे म्हणजे
खा.संजय राऊत आजच्या शिवसेना (उबाठा) खासदारांच्या मातोश्रीच्या बैठकीला उपस्थित नव्हते.  याबाबत                        “संजय राऊत शिवसेनेतून काढल्यात जमा आहे.” असा
असा गौप्यस्फोट प्रशांत आष्टीकर यांनी केला आहे.*

*मुद्दे:*
१. *’वचननामा’ ते ‘वर्षा’:* २०१९ ला युती तुटली. राऊत ‘सामना’तून  बडबडले. निकाल काय ?  तर शिवसेनेत फूट पडली.
२. *’ईडी’ विरुद्ध ‘ओके’:* “५० खोके, एकदम ओके” – हे वाक्य राऊतांचेच. पण ‘खोके’ कोणाकडे गेले, याचा तपास  अद्याप  लागला  नाही.  मात्र ‘आमदार’ शिंदे गटात गेले.
३. *’रिमोट कंट्रोल’:* २०१९ पूर्वी ‘मातोश्री’ वरून रिमोट चालतो, अशी टीका भाजप करायचा. आज ‘सागर’ बंगल्यावरून ‘वर्षा’चे निर्णय होतात, अशी चर्चा आहे.

*”वाघाने स्वतःच नखं काढून घेतली, आणि शिकाऱ्याने शांतपणे जाळं टाकलं. टायगर संपला, लांडगा आला. पण जंगलाचा राजा कोण?” असा प्रश्न आष्टीकर विचारतात.*

*- माईमीडिया24 वृत्तसेवा*
*विश्लेषण: व्यंगचित्रकार प्रशांत आष्टीकर*

*टीप:* हे ‘वैचारिक विश्लेषण’ आहे. सार्वजनिक राजकीय घडामोडींवरील वैयक्तिक मते आहेत.

*चर्चा तर होणारच – शीतल हरीश करदेकर*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here