Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा *शशांक शेंडे साकारणार रहस्यमय मांत्रिकाची भूमिका*

*शशांक शेंडे साकारणार रहस्यमय मांत्रिकाची भूमिका*

12
0

आपल्या प्रत्येक भूमिकेने रुपेरी पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेता शशांक शेंडे लवकरच प्रेक्षकांसमोर गूढ भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्या दमदार अभिनयामुळे प्रत्येक भूमिकेला वेगळं वजन मिळतं, आणि त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक भूमिकेबद्दल रसिकांमध्ये कायमच उत्सुकता पाहायला मिळते.

‘घबाडकुंड’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये शशांक शेंडे तंत्र-मंत्रात पारंगत असलेल्या सिद्धयोगी मांत्रिकाची भूमिका साकारणाा आहेत. या चित्रपटातील त्यांच्या लूकची चर्चा सध्या रंगली आहे. संपूर्ण टक्कल, कपाळावर काळा टिळा, गळ्यात माळा आणि डोळ्यातील गूढ भाव या व्यक्तिरेखेला अधिकच भयावह बनवतात.

या भूमिकेबद्दल शशांक शेंडे म्हणतात, ‘ही भूमिका खूप वेगळी आणि आव्हानात्मक आहे. एका मांत्रिकाच्या मनोविश्वात शिरून त्याची शक्ती, त्यामागचं तत्त्वज्ञान आणि त्याचा उद्देश प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच खिळवून ठेवेल.’

हा रहस्यमय मांत्रिक नेमका कोण आहे? त्याच्या शक्तींचं गूढ काय आहे? आणि त्याचा खरा हेतू काय आहे? हे पहाणं नक्कीच औत्सुक्याचं आहे. ‘घबाडकुंड’ हा चित्रपट या सर्व प्रश्नांची उत्तरं देत प्रेक्षकांना थरारक आणि गूढ प्रवासावर घेऊन जाणार असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

एक भव्य आणि रहस्यमय ‘युनिव्हर्स’ मोठ्या पडद्यावर साकारण्याचा धाडसी प्रयत्न दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांनी केला आहे. या अभिनव संकल्पनेला ‘आयकॉन दी स्टाईल’ संस्थेचे निर्माते डॉ. रसिक कदम यांची भक्कम साथ लाभली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत नवा ट्रेंड निर्माण करण्याच्या तयारीत असलेला ‘घबाडकुंड’ येत्या १९ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here