Home मुंबई *मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील पावसाळापूर्व* *कामांची आ. प्रवीण दरेकर यांच्याकडून पाहणी*

*मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील पावसाळापूर्व* *कामांची आ. प्रवीण दरेकर यांच्याकडून पाहणी*

14
0

मुंबई – येणाऱ्या पावसाळ्यात आपल्या विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना पाणी साचण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागू नये यासाठी आज शुक्रवारी भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त मनिष वाळुंज (परिमंडळ ७) यांच्या समवेत मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील पावसाळापूर्व कामांचा आढावा घेत प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. तसेच पावसाळ्याआधी ही कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही आ. दरेकर यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना केल्या.

याप्रसंगी प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक व प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश दरेकर, नगरसेविका निशा परुळेकर, नगरसेविका स्वाती जयस्वाल, नगरसेविका नीलम गुरव, नगरसेविका आदिती खुरसंगे, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रफुल तांबे, आरती गोळेकर, वॉर्ड कार्यकारी अभियंता गणेश मुंडे, राकेश शिंदे, कल्पक मार्डे, नितीन शिंदे, हितेंद्र कोसम्बीया, स्वप्नील गुंड, शुभम पवार, नागनाथ रोहिले, सुशांत मांडेवाड, गणेश सातपुते, आर. जी. मोरे, डी. ए. जाधव, जी. एस. शिरसाट, एस. ए. चौगुले, पी. एस. यादव, ए. पी. पळसुळे, अमित खेडेकर, माधव कुलकर्णी, गजानन धाडवे, बालाजी बिरादार यांसह मागाठाणे विधानसभेचे संयोजक कृष्णकांत दरेकर, मंडळ अध्यक्ष अमित उतेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते रवी जुवळे, वॉर्ड क्र. ३ चे वॉर्ड अध्यक्ष निकेश तळेकर, वॉर्ड क्र. ४ चे वॉर्ड अध्यक्ष संदीप तोटते, वॉर्ड क्र. ५ चे वॉर्ड अध्यक्ष सुरज नावाडकर, वॉर्ड क्र. ११ चे वॉर्ड अध्यक्ष दीपेश वर्तक, वॉर्ड क्र. १२ चे वॉर्ड अध्यक्ष गणेश ताटे, वॉर्ड क्र. २६ चे वॉर्ड अध्यक्ष मयूर पंडागळे, सम्राट कदम उपस्थित होते.

या पाहणी दौऱ्यात आ. दरेकर यांनी मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक ३ मधील दहिसर (पूर्व) येथील वैशाली नगर, मीनाक्षी मार्बल, अवनी सोसायटी जवळील परिसर, वॉर्ड क्रमांक ४ येथील दहिसर (पूर्व) मधील राज नगर, एस.एन. दुबे रोड, मच्छिमार्केट जवळील परिसर, वॉर्ड क्रमांक ५ मधील दहिसर (पूर्व) येथील विद्याभूषण शाळा, संभाजीनगर, शखेश्वर सोसायटी जवळील परिसर, वॉर्ड क्रमांक ११ येथील बोरिवली (पूर्व) मधील श्रीकृष्ण नगर जवळील परिसर, वॉर्ड क्रमांक १२ मधील बोरिवली (पूर्व) येथील देवीपाडा हायवे सबव, टाटापॉवर, राजगड चौक, सुविद्या शाळेजवळील परिसर, तर कांदिवली (पूर्व) येथील वॉर्ड क्रमांक २४ मधील गोकुळ नगरी सोसायटी व गणपती टॉवर जवळील परिसर, वॉर्ड क्रमांक २५ येथील इंद्राजी मार्केट परिसर आणि वॉर्ड क्रमांक २७ येथील महेंद्र गेट जवळील परिसराची पाहणी करण्यात आली. यावेळी आ. दरेकर यांनी स्थानिक नागरिकांशीही संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here