Home मुंबई *महागाईचा भडका, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ*

*महागाईचा भडका, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ*

20
0

*मुंबई-* अमेरिका आणि इराण युद्धाच्या झळा आता भारताला तीव्र बसू लागल्या आहेत. होर्मुजचा वाद चिघळला असताना भारतात मात्र महागाईचा भडका उडाला आहे.
निवडणुका संपल्यानंतर आता एकापाठोपाठ एक दरवाढ सुरू झाली आहे. सीएनजी, दूध, खाद्यतेल, गॅस सिलिंडर सगळ्या गोष्टी महाग झाल्या असताना आता त्यात पेट्रोल डिझेलच्या दरवाढीची भर पडली आहे.

कच्चा तेलाच्या किंमती वाढत असल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. याशिवाय भारतात आयात होणाऱ्या वस्तू देखील अधिक महाग झाल्या आहेत. इतकंच नाही तर वीज, इंधनाची बचत करण्याचं सोनं चांदी खरेदी न करण्याचं आवाहन पीएम मोदींनी केलं आहे. नागपूरमध्ये सध्या पेट्रोलचे दर १०७.१८ पैसे प्रति लिटर मिळत आहे. पेट्रोल ३ रुपये १६ पैसे प्रति लिटर महाग झाल्याने खिशाला चांगल्याच झळा बसणार आहेत. तर डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपये ११ पैसे, सध्या डिझेलचे दर ९३.६९ रुपये लिटर मिळणार आहे. इंधन दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे. मुंबईत डिझेल ९३.१४ (+३.११) रुपये प्रति लीटरने मिळणार आहे. तर पेट्रोलसाठी लीटरमागे मुंबई १०६.६८ (+३.१४) रुपये मोजावे लागणार आहे. या दरवाढीमुळे आता महागाईचा मोठा भडका उडणार आहे. ट्रान्सपोर्टचा खर्च वाढेल आणि पर्यायाने वस्तूंच्या किंमतीदेखील वाढतील.

पुण्यात पेट्रोल १०७.८४ तर डिझेल ९४.४५ रुपये प्रति लीटर मिळत आहे. ठाण्यात १०६.८४ रुपये तर डिझेल ९६ रुपये ६६ रुपये दर आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल १०६.३४ रुपये प्रति लीटर तर डिझेल ९५.६४ रुपये प्रति लीटर दराने मिळणार आहे. दर वाढल्याच्या नंतर पावर पेट्रोल ११७.५९ रुपये प्रति लीटरने मिळत आहे. एप्रिल महिन्यात घाऊक इंधन महागाईत झालेल्या तीव्र वाढीच्या पाठोपाठ ही वाढ दिसून आली आहे; कच्चे तेल, नैसर्गिक वायू, पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचे दर वाढल्यामुळे ही महागाई वाढली आहे. जगातील तिसरा सर्वात मोठा तेल ग्राहक असलेल्या भारताला, कच्च्या तेलाच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग असलेल्या ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ परिसरातील तणावामुळे निर्माण होणाऱ्या ऊर्जा पुरवठ्यातील व्यत्ययांचा विशेष फटका बसला आहे. माल वाहतूक, लॉजिस्टिक्स आणि उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे इंधन विक्रेते तसेच विविध क्षेत्रांतील उत्पादकांवरही दबाव वाढला आहे.

***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here