Home मुंबई *भोर-नसरापूर घटनेतील नराधमाला फासावर चढवणार*

*भोर-नसरापूर घटनेतील नराधमाला फासावर चढवणार*

9
0

*भक्कम पुरावे गोळा करून आरोपीवरील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार*

*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांना निर्देश*

मुंबई :- भोर-नसरापूर येथील साडे तीन वर्षाच्या चिमुकलीवर पाशवी अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच आरोपीवरील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्याला तत्काळ फाशी व्हावी यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करावेत असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांना दिले आहेत.

पुणे जिल्ह्याला काल हादरवून सोडणाऱ्या घटनेचे आज अतिशय तीव्र पडसाद भोर आणि नसरापूर परिसरात उमटले. संतप्त झालेल्या ग्रामस्थानी पुणे बंगळुरू हायवेवर रास्ता रोको केला आहे. या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गंभीर दखल घेतली आहे. तर उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही तत्काळ पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप गिल यांच्याशी फोनवरून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या घटनेतील आरोपीने यापूर्वीही असाच गुन्हा केला असून आता अशा नराधमाला जगण्याचा कोणताही अधिकार नाही, त्यामुळे त्याच्यावर कठोर कलमे लावून त्याला फासावर चढवण्याची तजवीज करावी असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी शासन पूर्णपणे प्रयत्नशील राहील असेही सांगितले आहे. या आरोपीवरील खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पीडित मुलीच्या कुटुंबियांना न्याय मिळवून दिला जाईल असेही शिंदे यांनी आश्वस्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here