*हिंसाचार रोखण्यासाठी लोकसहभाग आवश्यक- डॉ. नीलम गोऱ्हे*
*वेळ पडल्यास स्वरक्षणासाठी महिलांना हत्यार द्या..! डॉ. गोऱ्हे यांचे प्रतिपादन*
मुंबई: वसई येथे घडलेली संतापजनक, दुःखद आणि दुर्देवी घटनेत परिचित व्यक्तीनेच एका तरुण महिलेवर प्राणघातक वार केला. लोखंडाच्या माराने झालेला हा हल्ला तरुणीच्या जीवाला धोका निर्माण करणारा ठरला. सदर प्रसंगी मदत करण्या ऐवजी आसपासचे नागरिक पाहत बसले ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे.
महिला हिंसाचार थांबावा यासाठी लोकसहभाग वाढवण्याच्या दृष्टीने स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा या नात्याने आम्ही ‘झिरो टॉलरन्स टू ऑल टाइप्स ऑफ व्हायोलेन्स अगेन्स्ट वुमन्स’ अशी मोहीम हाती घेतली होती. महिलांचे अत्याचार सहन केल्या जाणार नाही यासाठी पोलिसांनी संपुर्ण महाराष्ट्रात देखील लोक सहभाग वाढुन भूमिका घ्यावी असे मत डॉ नीलम गोऱ्हे यांनी व्यात केले.
वेळ पडल्यास संरक्षणासाठी महिलांना हत्यार देण्यात यावी असे देखील त्या म्हणाल्या. पोलिस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांच्या बडीकॅप योजने अंतर्गत सर्वसामान्य नागरिक देखील कॉन्स्टेबल च्या माध्यमातून स्वसंरक्षनासाठी प्रयत्न करू शकतात. लोकांचे धैर्य वाढवून वेळ प्रसंगी ते मदतीला धावले पाहिजे यासाठी पोलिसांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सोबतच आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी उपसभापती म्हणून देखील पाठपुरावा करेल असे आश्वासन या देखील डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.





















