Home महाराष्ट्र *विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ओबीसींच्या आंदोलनस्थळी भेट देणार* ...

*विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ओबीसींच्या आंदोलनस्थळी भेट देणार* *आंदोलनासंदर्भात वडेट्टीवार यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

132
0

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये, अशी मागणी होत आहे. सरकारने याबाबत लेखी आश्वासन द्यावे यासाठी लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे उपोषण आंदोलन करीत आहे. परंतु या आंदोनलाची सरकार दखल घेत नाही. याबाबत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली असून 20 जून रोजी दुपारी दोन वाजता वडेट्टीवार आंदोलनस्थळी भेट देणार आहेत.

वडेट्टीवार म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये या मागणीच्या लेखी आश्वासनासाठी वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे हे प्राणांतिक उपोषण करत आहेत. या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. तरी देखील या आंदोलनाची सरकारने दखल घेतली नाही. यासंदर्भात वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आज चर्चा केली आहे.

शासनाकडून बेदखल करण्यात आलेल्या या आंदोलनाला 20 जून रोजी वडेट्टीवार भेट देणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here