Home मुंबई *काय विष्णू या वर्षी रक्षाबंधनाला आला नाही*

*काय विष्णू या वर्षी रक्षाबंधनाला आला नाही*

60
0

*असा नेता होणे नाही*
*श्री उद्धव ठाकरे हे खरे खुरे शिवसैनिकांचे कुटुंबप्रमुख आहेत*
————————————————–
*सहा महिन्याच्या कालावधीनंतर जेव्हा मी (विष्णू करमपुरी) मातोश्री बंगल्यावर गेलो काही वेळ प्रतीक्षा नंतर शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री उद्धव ठाकरे साहेब आले भेटीला तेव्हा सोलापूरचे संपर्कप्रमुख शिवसेना उपनेते सुषमा अंधारे ताईंनी सोलापूरचे शिवसैनिकांची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी अंधारे ताईंना म्हणाले हे सर्वजण सोलापूरचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत असे म्हणून सर्वांना नावानिशी विचारपूस केली त्यावेळी मी विष्णू कारमपुरी देखील उपस्थित होतो. मा. उद्धव साहेबांनी सगळ्यांना विचारपूस करत मला उद्देशून म्हणाले काय विष्णु तू यावर्षी रक्षाबंधनाला मला राखी बांधायला बिडी कामगार माता-भगिनीना घेऊन आला नाही असे विचारले तेव्हा माझ्या डोळ्यात आश्रू आले तेव्हा कळाले की उद्धव साहेब हे खरेखुरे शिवसैनिकांचे कुटुंब प्रमुख आहेत याची जाणीव झाले*
*सन १९९९ पासून महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विडी कामगारांसह मातोश्री बंगल्यावर दरवर्षी रक्षाबंधन सण साजरा केला जातो. मा.बाळासाहेबासह उद्धव ठाकरे साहेब , आदित्य ठाकरे साहेब , तेजस साहेब , यांना रक्षाबंधन करण्यात येत असे ती परंपरा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आयातीनंतरही अखंडितपणे चालू होती गेल्या दोन वर्षांपूर्वी नवीन जिल्हाप्रमुख अजय दासरी यांची नेमणूक झाली त्यानंतर पदाधिकाऱ्यांचा वाद आणि कामगार सेनेचा पदाधिकाऱ्यांचा वारंवार अपमान त्यामुळे काही काळ पक्षापासून दूर राहिलो आणि सन २०२५ च्या रक्षाबंधन सणाच्या कालावधीत मी स्वतः गंभीर आजाराने दवाखान्यात ॲडमिट होतो म्हणून मातोश्रीला रक्षाबंधनाला जाता आले नाही*.
*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते व सोलापूरचे नूतन संपर्कप्रमुख सौ सुषमाताई अंधारे यांच्या नेतृत्वाखाली ६ एप्रिल रोजी नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबत मातोश्री बंगल्यात गेलो त्यावेळी साहेबांनी वरील उद्गार काढले तेव्हा माझ्या जन्माचा सार्थक झाल्यासारखे वाटले त्याचबरोबर निष्ठावंत शिवसैनिकांन बाबत ठाकरे कुटुंबीय नेहमी त्यांची चिंता करते हे दिसून आले मा. उद्धव साहेबांच्या भेटीच्या वेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत , शिवसेना सचिव विनायक राऊत , शिवसेना नेते चंद्रकांत खैरे , शिवसेना उपनेते सुषमाताई अंधारे आणि सोलापूर चे प्रताप चव्हाण , महेश धाराशिवकर , संतोष केंगळकर , श्री रवींद्र म्हात्रे साहेब व माझे सहकारी श्रीनिवास बोगा यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी व निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते*.
*यावेळी मी स्वतः एका लेखी पत्राद्वारे पूर्ववत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसैनिक म्हणून महाराष्ट्र कामगार सेनेचे काम मरेपर्यंत करीत राहीन असे निवेदन मा. उद्धव साहेबांना दिले आणि उद्धव साहेबांनी जोरात कामाला लाग असा आदेश दिला*.
*********************************
*फोटो मॅटर* :- *शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री उद्धव ठाकरे साहेबांना कामगार सेनेचा कामकाज सुरू करण्याचे विनंती निवेदन देताना महाराष्ट्र कामगार सेनेचे अध्यक्ष विष्णू पारंपारिक (महाराज सदर प्रसंगी खासदार अरविंद सावंत शिवसेना सचिव विनायक राऊत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे शिवसेना उपनेते व सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख सुषमाताई अंधारे महेश धाराशिवकर आदी दिसत आहेत*.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here