Home Uncategorized *घाटकोपर ‘एन’ विभागातील नागरी समस्यांबाबत तातडीच्या कार्यवाहीची मागणी — ॲड. अमोल मातेले*

*घाटकोपर ‘एन’ विभागातील नागरी समस्यांबाबत तातडीच्या कार्यवाहीची मागणी — ॲड. अमोल मातेले*

21
0

*घाटकोपर ‘एन’ विभागातील नागरी समस्यांबाबत तातडीच्या कार्यवाहीची मागणी — ॲड. अमोल मातेले

मुंबई : घाटकोपर (पूर्व) येथील ‘एन’ विभागात नागरिकांना भेडसावत असलेल्या विविध नागरी सुविधा व पायाभूत समस्यांबाबत गुरुवारी सहाय्यक आयुक्त यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी संबंधित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवकचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी नागरिकांच्या वतीने निवेदन सादर करत पुढील महत्त्वाच्या बाबी मांडल्या आहेत.
पारशीवाडी गणेश मैदान शेजारील समाज कल्याण केंद्रास ‘स्व. कै. पां. रा. कदम समाज कल्याण केंद्र’ असे नामकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर करावा.अण्णाभाऊ साठे मैदान परिसरात ड्रेनेज लाईन योग्य प्रकारे जोडून सांडपाणी व्यवस्थापन सुरळीत करावे.
सम्राट अशोक बुद्धविहार परिसरात कचरा डब्ब्यांची संख्या वाढवून नियमित स्वच्छता राखावी.

दत्तकवस्ती संस्थेकडील युनिट वाटपातील अनियमिततेची चौकशी करून पारदर्शकता सुनिश्चित करावी.सोनिया गांधी नगर (भंगार गल्ली) येथे नवीन ड्रेनेज लाईन टाकून समस्या कायमस्वरूपी सोडवावी.
अण्णाभाऊ साठे मैदान समोरील सार्वजनिक शौचालयाचे नूतनीकरण करून आधुनिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
संबंधित ठिकाणी सिमेंट काँक्रिट रस्ता बांधण्यात यावा.

कन्नड बाग येथील प्रलंबित सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम तातडीने सुरू करावे.
जन्म दाखले मिळण्यात होणारा विलंब दूर करून सेवा कार्यपद्धतीत सुधारणा करावी.
रजा हबीब मजीद परिसरातील तुटलेली ड्रेनेज लाईन नव्याने टाकावी.आझादनगर, बाबाजी मठ परिसरात नवीन पाणीपुरवठा लाईन सुरू करावी.
सुभेदार शाळेसमोरील सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती करावी.सुभेदार शाळा ते अंजुमन रिसलत हक मजीद मार्गावर नवीन २ इंची पाणी लाईन टाकावी.धर्मवीर संभाजी पथ येथे अपघात टाळण्यासाठी आवश्यक ठिकाणी गतिरोधक बसवावेत.
“वरील सर्व प्रश्न नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असून त्यावर तातडीने स्थळ पाहणी करून कार्यवाही करण्यात यावी.” अशी मागणी ॲड. अमोल मातेले यांनी केली.
प्रशासनाने यावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले.

***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here