Home Uncategorized *शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने चैत्र नवरात्रोत्सवाचा जागर*

*शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने चैत्र नवरात्रोत्सवाचा जागर*

24
0

चैत्र महिन्यात येणाऱ्या चैत्र नवरात्रीला हिंदू संस्कृतीत विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा, म्हणजेच गुढीपाडवा, या दिवशी या नवरात्रोत्सवाची मंगलमय सुरुवात होते. या पवित्र उत्सवाचा जागर करण्यासाठी शेलार मामा फाऊंडेशनने पुढाकार घेतला असून, अभिनेता सुशांत शेलार आणि पत्नी साक्षी सुशांत शेलार यांच्या विद्यमाने लोअर परेल येथे १९ मार्चपासून ते २७ मार्च या कालावधीत ‘कुलस्वामिनी भैरी भवानी’ चैत्र नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा होतोय.

उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रेरणेने आणि खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेलारमामा फाऊंडेशनचे अध्यक्ष सुशांत अरुण शेलार यांच्या संकल्पनेतून हा चैत्र नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री – महाराष्ट्र राज्य), देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री -महाराष्ट्र राज्य), सुनेत्रा पवार (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य), डॉ.निलम गोऱ्हे (उपसभापती- विधान परिषद), खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विशेष उपस्थितीसह अभिनेता सौरभ गोखले, मेघन जाधव, विघ्नेश जोशी, अक्षय मुडावदकर, डॉ. निखिल राजशिर्के, अभिनेत्री तेजस्विनी पंडित, रेश्मा शिंदे आदी मनोरंजन आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर या उत्सवाला हजर राहणार आहेत.

गेल्या काही वर्षापासून शेलारमामा फाऊंडेशनतर्फे मुंबईच्या लोअर परळ येथे चैत्र नवरात्रोत्सवाचे आयोजन करणात येते. हिंदू धर्म, आपल्या परंपरा आणि संस्कृती याचे जतन आणि संवर्धन यासह हा समृद्ध वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा हा या चैत्र नवरात्रोत्सवामागचा हेतू असल्याचे सुशांत शेलार यांनी सांगितले.

कोकण वैभव जवळ, तालचेकरवाडी शाळेसमोर, लोअर परळ उड्डाणपुलाखाली १९ मार्च २०२६ ते २७ मार्च दरम्यान रंगणाऱ्या या उत्सवात अभिषेक, शृंगार पूजा, मंडल पूजा, पाठ वाचन, नवचंडी होमहवन,भजन, ललिता सहस्त्रनाम, कुंकूंमार्चन, देवीचा गोंधळ, जागरण महिला पुरोहितांचे पठण, श्रीरामनवमी उत्सव, विसर्जन आदी आराधनेने चैत्र नवरात्री उत्सवाचा जागर केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here