Home मुंबई *मुंबई विमानतळावरील २००० कर्मचाऱ्यांच्या रोजगारासाठी शिवसेना प्रणित एअरपोर्ट युनियन आक्रमक*

*मुंबई विमानतळावरील २००० कर्मचाऱ्यांच्या रोजगारासाठी शिवसेना प्रणित एअरपोर्ट युनियन आक्रमक*

24
0

मुंबई
मुंबई विमानतळावर ग्राऊंड हँडलिंग सेवा देणाऱ्या BWFS किंवा (Bird Aviation Services) चे कंत्राट ३१ मार्च २०२६ रोजी संपत आहे. या बदलामुळे सुमारे २००० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार असल्याने, कर्मचाऱ्यांचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी *शिवसेना पुरस्कृत ‘ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉइज युनियन’* मैदानात उतरली आहे.
*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली, आमदार व युनियन अध्यक्ष मुरजी पटेल* यांच्या नेतृत्वात हे आंदोलन छेडण्यात आले आहे.

*महत्त्वाच्या मागण्या व पुढील पाऊल:*
या प्रश्नी युनियनचे शिष्टमंडळ शुक्रवारी, २० मार्च, सकाळी १० वाजता, टर्मिनल १ येथे विमानतळ मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांची भेट घेणार असून खालील मागण्या मांडणार आहे:
– *BAS अथवा मधील सर्व २००० कर्मचाऱ्यांना कोणताही भेदभाव न करता तात्काळ नवीन कंपनीत सामावून घ्यावे.*
– *वेतनश्रेणी, वरिष्ठता आणि सेवा अटी पूर्वीप्रमाणेच अबाधित ठेवाव्यात.*
– *हस्तांतरण प्रक्रियेत कामगारांवर अन्याय होणार नाही याची लेखी हमी द्यावी.*

“कामगारांच्या प्रश्नावर व्यवस्थापनाची भूमिका स्पष्ट न झाल्यास *शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन* छेडले जाईल. एकाही कामगाराला बेरोजगार होऊ देणार नाही.”

अधिक संपर्कासाठी:
98334 62111
-कुणाल रवींद्र सरमळकर (सरचिटणीस, ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉइज युनियन)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here