Home मुंबई मनसेच्या ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ संकेतस्थळाच्या नावाचे २४ तासात दुसरे नकली संकेतस्थळ !

मनसेच्या ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ संकेतस्थळाच्या नावाचे २४ तासात दुसरे नकली संकेतस्थळ !

29
0

विघ्नसंतोषींवर कारवाई करणार मनसे!

१९ मार्च २०२६ ला राज ठाकरेंनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर गुढी पाडवा मेळाव्यात महाराष्ट्राच्या पुढच्या पिढ्यांसाठीचा विकास आराखडा बनवण्याच्या हेतूने, ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ हे संकेतस्थळ महाराष्ट्राला अर्पण केलं.
त्यानंतर मागील १२ तासांत या संकेतस्थळावर काही दशहजार लोकांनी भेट दिली. त्यानंतर काही विघ्नसंतोषी लोकांनी याच नावाचे एक दुसरे संकेतस्थळ बनवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
अशा विघ्नसंतोषींच्या विरोधात जी कारवाई करायची असेल ती केली जाईल. पण मनसेच्या ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ या संकेतस्थळाची लिंक
https://Maharashtra-next.in
दिली असून ,ती जास्तीत जास्त महाराष्ट्रभर आणि देशभर पसरेल हे जरूर पहावे ,असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.

https://Maharashtra-next.in

Maharashtra-next.in
#MaharashtraNext #महाराष्ट्र_पुढचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here