Home मुंबई *कांदिवली पुर्व समता नगरच्या ‘त्या’ विकासकावर तात्काळ कारवाई करावी* — भाजपा गटनेते...

*कांदिवली पुर्व समता नगरच्या ‘त्या’ विकासकावर तात्काळ कारवाई करावी* — भाजपा गटनेते आ. प्रवीण दरेकरांची मागणी*

39
0

मुंबई – भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी आज सभागृहात कांदिवली पूर्व येथील समता नगर येथील रहिवाशांच्या पुनर्विकासाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच विकासकावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणीही केली.

प्रश्नोत्तराच्या तासावेळी सभागृहात बोलताना दरेकर म्हणाले की, “कांदिवली पूर्व येथे समता नगरला एसडी कॉर्पोरेशनचा प्रकल्प आहे. या ठिकाणी दोन प्रकारची डेव्हलपमेंट झाली. काही लोकं सरोवा इमारतीत राहायला गेली असून काही लोकं डेव्हलपमेंटच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारला, म्हाडाच्या यंत्रणेला विकासक धूप घालत नाहीत. एसडी कॉर्पोरेशनने हा प्रकल्प शापुरजी पालनजीला दिलाय. खासदार पियुष गोयल यांनी दट्ट्या दिल्याने १९ कोटी दिले. ११६ कोटी कॉरपस यायचा होता तोही दिलेला नाही. येथील लोकं स्वयं पुनर्विकासाला पुढे आली. मात्र म्हाडाचे अधिकारी त्याला नकार देत आहेत. एका विकासकाला पाठीशी घालण्यासाठी संपुर्ण यंत्रणा कामी लागलीय. त्यामुळे या विकासकावर तात्काळ कारवाई व्हावी, रद्द ऍग्रिमेंटची अंमलबजावणी व्हावी आणि उर्वरित रहिवाशांना किती कालावधीत घरे देणार याची माहिती द्यावी.” असे दरेकरांनी म्हटले.

दरेकरांच्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले की, “१ एप्रिल २०२६ पासूनचा बार्चआर्ट आणि प्लॅन विकासकाने म्हाडाकडे सदर केलाय. त्याप्रमाणे दर तीन महिन्यांनी या प्रकल्पाचा रिव्ह्यू घेतला जाईल. जो बार्चआर्ट केलाय त्याप्रमाणे कामाची गती नसेल तर निश्चितपणे विकासकावर कारवाई केली जाईल. ”

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here