कोल्हापूर, सांगली आणि मिरजच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर असताना राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी
शनिवारी मिरज येथील ऐतिहासिक ‘इंडियन म्युझिकल शॉप’ ला भेट दिली. मिरजेची तंतू वाद्य आणि सतार केवळ एक वाद्य नसून, ती भारतीय संस्कृतीचा आणि १३८ वर्षांच्या अखंड परंपरेचा अनमोल ठेवा आहे.
सुमारे पावणेदोनशे वर्षांपासून पिढ्यानपिढ्या जतन केलेली सतार बनवण्याची ही कला प्रत्यक्ष पाहणे, हा एक वेगळाच अनुभव होता. मिरजेतील सतार मेकिंग गल्लीत जवळपास २५ दुकानांमधून हा व्यवसाय मोठ्या दिमाखात सुरू आहे. जगभरात सतार आणि तंतू वाद्य येथून जातात.
यावेळी मंत्री शेलार यांनी कारागिरांशी चर्चा करून, सतार निर्मितीची प्रक्रिया आणि त्यांच्या समोरील आव्हाने प्रत्यक्ष जाणून घेतली.
“मिरजेच्या या सांस्कृतिक ठेव्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, इथल्या कारागिरांच्या हाताला अधिक प्रतिष्ठा आणि बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू.”असे त्यांनी आश्वस्त केले



















