Home Uncategorized *गोष्ट पुण्याच्या इंदापूरातील भिगवणच्या लेकीची!* *आक्रस्ताळे राजकारण इथे कामाचे नाही!*

*गोष्ट पुण्याच्या इंदापूरातील भिगवणच्या लेकीची!* *आक्रस्ताळे राजकारण इथे कामाचे नाही!*

55
0

*बेटी धनाची पेटी, घरच्या लेकीला लक्ष्मी म्हणतात!* *कुठे लेकीचं कौतुक तर कुठे तिच्या जन्माला विरोध म्हणून पोटातच मारले जाते.आपल्याकडे अजुनही समाज म्हणावा तसा सुधारला नाही, कारण गावोगावी असणाऱ्या जातीपातीचे गट आणि जातीत वाटले गेलेले राजकारण, खोटी प्रतिष्ठा, जातीतून वाळीत टाकणे असे प्रकार आजही घडताहेत.*
*हिंदू-मुस्लीम धर्म जातीवाद तर नेहमीच ऐरणीवर असतो. कारण गाव पातळीवर असे विषय घराघरात लगेच पोहोचतात इथे विचित्र परिस्थिती निर्माण झाली तर त्या कुटुंबांचे ,त्या मुलीचे जगणे मोठं कठीण बनते.*
*तर दुसरीकडे मोठमोठ्या कुटुंबात हिंदू-मुस्लिम लग्नगाठ बांधल्याची उदाहरणे आहेत.ते आपल्या प्रतिष्ठेमुळे समाजात मानाने जगतात.*
*त्यांना कुणी प्रश्न विचारण्याचे धाडसही करत नाही…तर सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील मुलामुलींवर आंतरजातीय, आंतरधर्मीय लग्नाबाबत विषय वेगळ्या पध्दतीने समाजातील धर्म प्रतिष्ठेचा विषय बनतात.*

● *विषय आहे सन्मानाने जगण्याचा!*
*पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना ऐरणीवर आली आणि मोठा प्रश्न असा की कुठल्या गोष्टीत किती राजकारण करायचं आणि लोकांच्या खाजगी आयुष्यात किती आक्रमण करायचे, असे कठीण विषय ढोल वाजवून राजकीय, धार्मिक व्देषाचे बनवायचे नसतात याचे भान जर लोकप्रतिनिधीनींना आमदारांना नसेल तर या अशा लोकांना काही मर्यादा रेषा आखली जाणे आवश्यक वाटू लागलेय.*
*भाजप आमदार राहुल कुल आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी नावे जोरदार चर्चेत आलीत. कुणालाही मदत करणे चुक नाही, पण एका तरुण मुलीच्या पळून जाण्याचा विषय ज्या प्रकारे माध्यमातून समोर आला, त्यावर आंदोलन ,आक्रोश मोर्चा असे सगळे प्रकार झाले.ते पहाता या मुलीच्या कुटुंबाचे समाजात ताठ मानेने जगणं कठीण करुन ठेवलंय! का?*
*समाजाचे ठेकेदार सुसाट ,सैराट सुटले! का ? कशासाठी? त्या मुलीचं जगणं सुरळीत होईल याकडे लक्ष का जात नाही?*
● *विषय गंभीर पण …संवेदनशीलता कुठे आहे?*
*चार दिवस लग्नाला उरले असताना १७ फेब्रुवारीला तरुणीचं अपहरण, आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी फेकून पळवून नेलं अशी बातमी इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरातून समोर आली.*
*संशयित आरोपी हा तरुणीच्या शेजारीच राहणारा, पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली! आरोपींचा शोध घेण्यासाठी पाच ते सहा विशेष पथके तयार करण्यात आली.*
● *२१ वर्षीय तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणाला २० फेब्रुवारी २०२६ ला मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी स्वतःहून मध्यरात्री १:३० च्या सुमारास बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाली.तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबाबात स्पष्ट केले आहे की, तिचे अपहरण झाले नसून ती स्वतःच्या मर्जीने तिच्या प्रियकरासोबत निघून गेली होती तिने प्रतिज्ञापत्रही सादर केले.*
*तिच्या आई आणि नातेवाईकांनी तो अमान्य केला आहे. मुलीवर दबाव असून तिला आणि तिच्या भावांना जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप आईने केला.*

● *राजकीय वळण लागले कशासाठी?*
*नातेवाईकांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर गंभीर आरोप केले असून, आरोपींना त्यांचे पाठबळ असल्याचा दावा केला.*
*न्यायालयाच्या आवारात ‘मुर्दाबाद’च्या घोषणा!*
संबंधित तरुणीला जबाब नोंदवण्यासाठी बारामती सत्र न्यायालयात नेले असता, त्या ठिकाणी तिच्या *नातेवाईकांनी मोठा गदारोळ केला. जहीर हारून शेख याचा चुलता अजहर शेख हा आमदार राहुल कुल यांचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. ‘राहुल कुल मुर्दाबाद’ अशा घोषणा देत नातेवाईकांनी न्यायालयाचा परिसर दणाणून सोडला. आमदारांच्या पाठबळामुळेच आरोपींनी हे धाडस केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.*
*आईने माध्यमांशी बोलताना सांगितले. या प्रकरणात आमदार राहुल कुल यांचा CDR (कॉल डिटेल रेकॉर्ड) काढला जावा, अशी मागणीही मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे.*

*या घटनेमुळे भिगवणमध्ये तणाव निर्माण होऊन ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ही काढण्यात आला.*

*भिगवण अपहरण प्रकरणात भाजप आमदाराचा हात? मुलीच्या आईचे गंभीर आरोप!*
*मुलाचा चुलता अजहर शेख याचे सोशल मीडिया स्टेटस आणि आमदारांसोबतचे फोटो आता या प्रकरणात चर्चेचा विषय ठरले आहेत. पोलीस आता या प्रकरणाची राजकीय कोनातूनही चौकशी करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.*
*मात्र कथित अपहरणाच्या २४ तासांनंतर माझे अपहरण झालेले नसून आमचे प्रेमप्रकरण असल्याचे मुलीने व्हिडीओद्वारे सांगितले आहे. हे अपहरण प्रकरण राज्यभरात चर्चेचा विषय ठरल्यानंतर आ गोपीचंद पडळकर भिगवणला आले. तिथे हजारोंचा जमाव जमला होता. पडळकर यांच्या नेतृत्वात हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजनही केले गेले होते. परंतु पोलिसांनी मज्जाव केल्याने मोर्चा होऊ शकला नाही.*

●’…*त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढत पडळकर यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत म्हणाले की,* *”अपहरणाच्या गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात यावे. याआधी अजहर शेखने तलाठ्याला मारहाण केली मात्र पोलिसांनी अटक केली* *नाही. त्याच्यावर अनेक प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. खरे तर त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करून त्याला बेड्या ठोकाव्यात. आमची मुलगी तिच्या आईच्या ताब्यात आणून द्यावी. MPSC पास झालेल्या मुलासोबत मुलीचे लग्न ठरले होते. पोलीस अधीक्षकांनी मुलीची सुखरूपपणे सुटका करावी,आम्ही त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढतो.*

● *’मुलीला सुखरूप सोडवा, पोलीस अधीक्षकांची हत्तीवरून मिरवणूक काढतो’*
*मुलीची टिकली गायब!*
*पोलिसांकडून आम्हाला त्वरित निकाल पाहिजे. व्हिडिओमध्ये मुलीची टिकली गायब केली आहे. हा मताचा विषय नाही तर हा आमच्या अस्तित्वाचा विषय आहे. भारतासारखा सुरक्षित देश जगात कुठे नाही. भारत हरल्यावर जे फटाके उडवतात, त्यांना जागा दाखवायची वेळ आली असल्याचे, पडळकर म्हणाले.*

*विषय या वडील नसलेल्या मुलीच्या जगण्याचा, तिचे दोन भाऊ सुरक्षित जगावेच ही तिची अपेक्षा असणारच!*
*तिचं या शेजारच्या मुलावर प्रेम होतं की आकर्षण हा विषय इथे दुय्यम!*
*आईचं आपल्या २१ वर्षीय मुलीकडे लक्ष नव्हत का?*आमदार कुल यांच्याशी जवळचे हे मुलाचे कुटुंब होतं तर आधीच या विषयी धर्माचा विषय तिला समजवला का गेला नाही?*
*आता ती मुलगी आ पडळकर यांच्या म्हणण्यानुसार जरी आईकडे परत आली तर तिच्या पुढच्या आयुष्याचं काय? गावात तिच्या कुटुंबाला गावकरी पुरेसा आधार देतील काय?*
*धर्मवाद हा नंतरचा विषय आहे. एक आमदार या मुलाच्या कुटुंबाच्या जवळचा,तर आमदार पडळकर यांनी जे थैमान घातले ते पुर्ण विषय समजून न घेता, ते धर्माच्या रक्षणार्थ मैदानात उतरले , मोठा आक्रोश केला तरीही या मुलीचे कसे व काय हित करणार? तिचे कौन्सिलिंग,समुपदेशन झाले तरी ती पुढे काय करेल , संन्यास घेऊन साध्वी बनेल? की कुठे तोंड लपवून बसेल?*

● *अशा विषयात महिला बालकल्याण, महिला आयोग काम करु शकते की नाही?*
*अशा विषयावर आपली आपल्या धर्माची संवेदनशील भूमिका ठरायला हवी,*
*पडळकर सारखे* *आक्रस्ताळी नेते उलट अशा विषयाची माती करायला निघालेत असे दिसतात.*
*यांच्यासाठी महिला लोकप्रतिनिधी काही रुपरेषा ,नियोजन करणार की नाही?का फक्त हिंदू- मुस्लिम वाद आणि बडबोलेपणाकरुन आपल्या मुली सुरक्षित, सुखाने जगू शकतील का याचा विचार व्हायला हवाच.*

● *सर्व लेकींवर आपला मालकी अधिकार आहे का?*
*राजकारण व धर्मवाद एकत्र आला तर कठीण आहे. असे विषय संवेदनशील पणे ,अगदी घरातील जागरुकतेपासून सुरु होतात.*
*कुटुंब नि समाजात एक संवेदनशील लक्ष्मण रेषा आखणे आवश्यक आहे.*
*दोन्हीकडच्या जगण्याच्या पध्दती वेगळ्या, आपल्या* *मुलांचं हित कशात आहे हे लहानपणापासून कळायला हवं!*
*सरकारने कायद्यासह विविध सामाजिक संस्था शिक्षक यांचा सहभाग चांगला असायला हवा.*
*समजून घ्या, विषय खोल आहे. मोठ्याने बोलून काहीही होणार नाही…*
*विषय समाजानेही सावरण्याचा, जागरूक असण्याचा आहे. दबाव तयार करण्याचा!*

***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here