भारतरत्न सचिन तेंडुलकर याने आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन या निवासस्थानी येऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांची पत्नी अंजली तेंडुलकर याही उपस्थित होत्या. सचिन यांचे ज्येष्ठ सुपुत्र अर्जुन यांच्या विवाहाची पत्रिका देण्यासाठी त्यांनी ही भेट घेतली.
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे आणि सचिन यांच्यात अनेक विषयावर चर्चा झाली. यात प्रामुख्याने राज्यातील क्रीडा सुविधांबाबत चर्चा केली. शासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती घेऊन त्याबद्दल समाधान व्यक्त केले.



















