कैरो, इजिप्त (६ फेब्रुवारी २०२६):
प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभलेल्या इजिप्तची राजधानी कैरो येथे आज पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात *ठाणे जिल्ह्याचे* नाव जागतिक स्तरावर चमकले. साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जाणारा मानाचा *’लोकमत वन वर्ल्ड’* पुरस्कार आज मला प्रदान करण्यात आला. या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ठाणे जिल्ह्यातून झालेली ही निवड राज्याच्या शैक्षणिक, साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रासाठी *भूषणावह* ठरली आहे.
हा सोहळा केवळ एक गौरव सोहळा नसून, *भारत आणि इजिप्त यांच्यातील दृढ होत चाललेल्या सांस्कृतिक संबंधांचे प्रतीक ठरला*.
नाईल नदीच्या काठी वसलेल्या या ऐतिहासिक शहरात भारतीय गुणवत्तेचा सन्मान होणे, हे दोन्ही देशांमधील वैचारिक आणि शैक्षणिक देवाणघेवाणीला नवी दिशा देणारे आहे. भारत आणि इजिप्तमधील ऐतिहासिक मैत्रीचे प्रतिबिंब या *’वन वर्ल्ड’* संकल्पनेत उमटलेले पाहायला मिळाले.
लोकमत समूहाचे अध्यक्ष *डॉ. विजय दर्डा* यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सोहळ्याला भारतीय उद्योग,कला, साहित्य, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. प्रसिद्ध अभिनेते *बोमन इराणी, श्रीमती अमृता फडणवीस, अभिनेत्री सौंदर्य शर्मा* यांसारख्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
पुरस्कार स्वीकारताना भावना व्यक्त करताना ते म्हणाले, *”हा पुरस्कार मी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक आणि माझ्या सर्व हितचिंतकांना अर्पण करतो. माझ्या आई-वडिलांनी आणि कुटुंबाने दिलेल्या प्रोत्साहनामुळेच मी समाजासाठी खारीचा वाटा उचलू शकलो.”*
इजिप्तसारख्या भव्य दिव्य शहरात हा सन्मान मिळणे हे मी माझे भाग्य समजतो अशी प्रतिक्रिया डॉ. प्रा प्रदीप ढवळ यांनी दिली . माझ्या कार्याची दखल घेतल्याबद्दल लोकमत समूहाचे मी मनापासून आभार मानले.”
*साहित्यिक मूल्ये जपण्यासोबतच शैक्षणिक संस्थांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या योगदानामुळे ही निवड करण्यात आली आहे.*
*इजिप्तच्या या भूमीत भारतीय कर्तृत्वाचा झेंडा फडकल्याने ठाणे जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.*





















