Home Trending Now पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्यानं मनसेमध्ये अस्वस्थता

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्यानं मनसेमध्ये अस्वस्थता

160
0

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्यानं मनसेमध्ये अस्वस्थता

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्यानं मनसेमध्ये काहीशी अस्वस्थता दिसून येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भात बैठक बोलवली आहे. या बैठकीत निमंत्रणावरून नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता वर्तवली जात  मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा, सभाही घेतल्या, पण शपथविधीलाच बोलावलं नाही; राज ठाकरेंनी बोलावली मनसेची तातडीची बैठक

 

 मुंबई : नरेंद्र मोदी  यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान  पदाची शपथ घेतली आणि देशात सलग तिसऱ्यांदा एनडीए सरकार स्थापन करण्यात आलं. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे  यांचं शपथविधी सोहळ्याला नसणं हे अनेकांच्या चर्चेचा विषय ठरतंय. राज ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्याच्या चर्चेनंतर मनसेमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बैठक बोलवली आहे. या बैठकीत निमंत्रणावरून नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे

गुरूवारी सकाळी साडेदहा वाजता मुंबईतील वांद्रे येथील रंगशारदा येथे मनसेची बैठक बोलावण्यात आली आहे. लोकसभेतल्या कामकाजाचा आढावा आणि आगामी विधानसभा, महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीसाठी बैठक बोलावण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या बदललेल्या भूमिकेनं मनसेत नाराजी पाहायला मिळत आहे. अशातच आता मनसे काही वेगळा निर्णय घेणार का? राज ठाकरेंचं पुढचं पाऊल काय असणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here