मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदिवली प्रभाग क्र.२६ मध्ये भाजप-महायुतीच्या उमेदवार प्रीतमताई पंडागळे यांच्या प्रचारार्थ मंत्री नितेश राणे यांची जाहीर सभा पार पडली.
“मुंबईला सुरक्षित, विकसित आणि जागतिक दर्जाचे प्रगत शहर बनवायचे असेल तर मुंबईला कुटुंबाच्या मक्तेदारीतून बाहेर काढणे गरजेचे आहे. तसेच मुंबईत बांगलादेशील रोहिंग्यांची वाढलेली संख्या कमी करण्यासाठी मुंबईला भाजप-महायुतीशिवाय पर्याय नाही. ”
“मुंबई महानगरपालिकेवर हिंदुत्ववाचा भगवा फडकवण्यासाठी आणि हिंदुत्ववादी विचारांचा महापौर बसवण्यासाठी भाजपा-महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे, आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर, नगरसेवक पदाच्या उमेदवार प्रीतमताई पंडागळे, विजय साळवी, अविनाश राय,
सचिन नांदगावकर, अमर पन्हाळकर, राकेश चव्हाते यांसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक मतदार, माता-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.






















