दि २४ डिसेंबर रोजी शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब व रिपब्लिकन सेना अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या मध्ये *मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व २९ महानगरपालिका निवडणुका युतीच्या माध्यमातून एकत्रित लढण्यासंदर्भात व संभाव्य जागा वाटपासंदर्भात अतिशय सकारात्मक चर्चा झाली.*
शिवसेना व रिपब्लिकन सेना युतीच्या माध्यमातून *येत्या २ दिवसात सर्व २९ महानगरपालिकेच्या जागावाटपाची अधिकृत घोषणा केली जाईल यावर शिक्कामोर्तब कालच्या बैठकीत करण्यात आले.*
सदर बैठकीला शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, खा मिलिंद देवरा, माजी खासदार राहुल शेवाळे व रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र सचिव विनोद काळे हे उपस्थित होते.



















