निलेश लंके यांच्या पीएवर हल्ला
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाच्या निलेश लंके यांनी विजय मिळवला. त्यानंतर आता निलेश लंके यांच्या पीएवर हल्ला करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. राहुल झावरे असे त्यांचे नाव आहे. नगरच्या पारनेरमध्ये हा हल्ला झाल्याचे समजते. यात राहुल हे गंभीर जखमी झाले
असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.



















