Home Uncategorized *दि. ४ ते ७ डिसेंबर २०२५ दरम्यान सलग ३ दिवस समुद्राला मोठी...

*दि. ४ ते ७ डिसेंबर २०२५ दरम्यान सलग ३ दिवस समुद्राला मोठी भरती*

41
0

*भरतीवेळी समुद्रकिनारी जाणे टाळावे तसेच यासंदर्भात प्रशासनाकडून जारी इतर सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन*
दि. ४ ते ७ डिसेंबर २०२५ दरम्यान सलग ३ दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. सदर भरती दरम्यान समुद्रामध्ये साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत मोठ्या भरतीचा तपशिल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये भरतीचा दिनांक व वेळ यासह भरती दरम्यान समुद्रात उसळणा-या लाटांची उंचीदेखील नमूद करण्यात आली आहे. दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्री १२ वाजून ३९ मिनिटांनी ५.०३ उंचीच्या लाटा उसळणार आहेत. मोठी भरती असण्याच्या सर्व दिवशी भरती कालावधीदरम्यान नागरिकांनी समुद्रकिना-यानजीक जावू नये, तसेच या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे मुंबई पोलिसांद्वारे वेळोवेळी देण्यात येणा-या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे.” असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाद्वारे नागरिकांना करण्यात येत आहे. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे येणाऱ्या अनुयायांनीदेखील समुद्रकिनारी योग्य खबरदारी बाळगावी.

वरीलनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे कळविण्यात आलेला मोठ्या भरतींचा तपशिल खालीलप्रमाणेः-

*दि. ४ ते ७ डिसेंबर २०२५ दरम्यानच्या भरतींचे वेळापत्रक…*

१. गुरुवार, दि. ०४.१२.२०२५ – रात्री – ११:५२ वा.- लाटांची उंची – ४.९६ मीटर

२. शुक्रवार, दि. ०५.१२.२०२५ सकाळी – ११:३० वा.- लाटांची उंची – ४.१४ मीटर

३. शनिवार, दि. ०६.१२.२०२५ -मध्यरात्री – १२:३९ वा.-लाटांची उंची – ५.०३ मीटर

४. शनिवार, दि. ०६.१२.२०२५ -दुपारी – १२.२० वा.- लाटांची उंची – ४.१७ मीटर

५. रविवार, दि. ०७.१२.२०२५ -मध्यरात्री – ०१.२७ वा. लाटांची उंची – ५.०१ मीटर

६. रविवार, दि. ०७.१२.२०२५ -दुपारी – ०१.१० वा. लाटांची उंची – ४.१५ मीटर

===

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here