Home Uncategorized *मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मुलुंड विभागात वाचन प्रेरणा दिन २०२५ संपन्न*

*मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मुलुंड विभागात वाचन प्रेरणा दिन २०२५ संपन्न*

79
0

सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय,
मुलुंड विभागात ‘डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंती’ निमित्ताने साजरा होणारा ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्स्फूर्तपणे साजरा झाला. प्रथम भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
विजय शेटे यांचा ‘उत्कृष्ट वाचक’ म्हणून ग्रंथालयाच्या कार्यवाह भाग्यश्री नूलकर यांनी गुलाबपुष्प व एक ग्रंथ भेट देऊन गौरव केला. तसेच अवंती महाजन यांनी वर्ष २०२४ सालातील प्रकाशित झालेल्या निवडक दिवाळी अंकांतील साहित्याचे संकलन म्हणजेच ‘अभिजात अक्षरे’ याचे प्रकाशन करण्यात आले.
महेश ठाकूर यांनी ग्रंथालयाला ‘एक गार्डन बेंच’ जेष्ठ सभासदांसाठी देणगी स्वरूपात दिल्याबद्दल त्यांचेही आभार मानले. त्यानंतर सहभागी सभासद विजया कापडी, अंजली बकाणे, वासंती पेठे, वैशाली अभ्यंकर,सुप्रिया मोरे, लक्ष्मण उपाध्ये, शुभांगी सिनकर, रंजनी साळुंखे, गीता गोखले, वैद्य, वसंत गोळे, अस्मिता सुतार, युगंधरा वळसंगकर यांनी आपले आवडीचे साहित्य सादर केले. तसेच प्रा. डॉ. भारती निरगुडकर यांनी वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने आपले चार शब्द व्यक्त केले. तरी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश कवटकर कार्यकारीणी सदस्य तसेच ग्रंथालय कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमांगी गायकवाड यांनी केले.
शेवटी भाग्यश्री नूलकर यांनी सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here